रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले…
राजुरा पोलिसांची धडक कारवाई ; पाच ट्रॅक्टरसह ११ लक्ष ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
राजुरा, १० एप्रिल : सास्ती परिसरामध्ये काही ईसम लपुन-छपुन अवैध रेतीचे उत्खनन करुन वाहतुक करीत असल्याची गोपनीय बातमीदारांकडुन माहिती मिळाली होती. या अनुषंगाने छापा टाकुन कार्यवाही करण्याबाबत पोलीस ठाणे राजुराचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी अधिनस्थ अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सुचना दिल्या होत्या. सदर सुचनेच्या अनुषंगाने आज दिनांक 10/04/2024 रोजी पोलीस ठाणे राजुरा येथील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी योजना आखुन गोवरी गावाचे समोरील उपाशी नाल्यामध्ये छापा टाकला असता एकुण 5 वेगवेगळया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये प्रत्येकी 1 ब्रॉस नाल्याची रेती अवैधरित्या उत्खनन करुन वाहतुक करण्याच्या तयारीत मिळुन आले. घटनास्थळावरुन एकुण 5 ट्रॅक्टर वाहन व ट्रॉलीमध्ये भरलेली रेती असा एकुण 11,70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कार्यवाहीत आरोपी 1) चालक महादेव कवडु शेंडे (36 वर्षे), 2) मालक चंद्रकांत भगवान कुईटे (48 वर्षे), 3) देविदास धोंडु कोटरंगे (45 वर्षे), 4) मधुकर सदाशिव गिरडकर (65 वर्षे) रा. अमराई वार्ड राजुरा, 5) सुरज चरणदास पिपरे (25 वर्षे), 6) चालक-मालक देविदास भिकाजी येवले (44 वर्षे), 7) अविनाश ॠषी सिडाम (35 वर्षे), 8) मालक प्रभाकर भुजंगराव कन्नाके (45 वर्षे), उर्वरीत सर्व सोमनाथपुर, राजुरा येथील रहिवासी असून यांचेविरुध्द पोलीस ठाणे राजुरा येथे कलम 379, 109 भा.दं.वि. अन्वये रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे तसेच पोलीस निरीक्षक राजुरा योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके, पोलीस हवालदार कैलास आलाम, पोलीस अंमलदार अमोल ठावरी यांनी पार पाडली.