कोरोना जनजागृती काव्यधारा – ७
कवी – सुनिल बावणे, बल्लारपूर
कविता : माझे कुटुंब माझी जबाबदारी
जनजागृती करुनी घेते जीवीतांची काळजी
शासनाची ही महत्वपूर्ण तयारी…
या साथीला (रोगाला) परास्त करण्या
“माझे कुटुंब माझी जबाबदारी”…
आरोग्याची तपासणी करण्या
आरोग्य सेवक येईल दारी…
निरोगी असावे कुटूंब अपुले तर
द्या त्यांना माहीती योग्य, खरी…
जीवीत हानी होवू नये कुणाची
शेजारी असो वा घरचा जरी…
“दूर रहा” म्हणजे तिरस्कार नव्हे
काळजी घ्या, नको धास्ती उरी…
साखळी तोडण्या कोरोनाची
थोड्या वेळाची माणसा दुरी बरी…
मास्क, डिसटंन्स, सॅनिटाईझर
कोरोना पासून संरक्षण करी…
इतिहास सांगतो माणूस जिंकला
आले कितीक रोग-राई, संकटे आजवरी…
जाणीव होण्या माणूसकीची
द्यावी कठीण परिक्षा एक तरी…
सन्मान व्हावा कोरोना योद्धयांचा
मानवतेची ओळख न्यारी…
सहभाग थोडा अमुचा त्यांच्या सोबत
“माझे कुटुंब माझी जबाबदारी”
कवी : सुनिल बावणे ‘निल’
बल्लारपूर, चंद्रपूर
संपर्क- ८३०८३३४१२३
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)
•••••••