लाइट्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन तर्फे महिला दिन उत्साहात साजरा
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. याच माध्यमातून कंपनीत काम करणारे अधिकारी कर्मचारी कामगार यांच्या परिवातील महिला सदस्य यांना कंपनीत बोलावून जागतिक महिला दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे उसगाव, म्हातारदेवी, शेणगाव, पांढरकवडा व नकोडा या ग्रामीण भागात सुद्धा गावातील सर्व महिलांसाठी जागतिक महिला दिन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला हि कुठेही मागे नाही, समाजात स्त्री-पुरुष समानता यावी महिलांना स्वतःचे हक्क व अधिकार माहिती व्हावे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून व्यवस्थापक कुमारी नम्रपाली गोंडाने, प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुसचे अधिकारी श्री. प्रशांत पुरी, श्री. मुकेश भेलावे, श्री. पुलक गोयल, श्री. पि.व्ही.राममूर्ती, जेसी रॉय मॅडम, श्री. मोहित कुमार शर्मा, अनुराग मत्ते म्हातारदेवी सरपंच सौ. संध्या पाटील, उसगाव सरपंच सौ. निविता ठाकरे, शेणगाव सरपंच सौ. पुष्पाताई मालेकर, नकोडा येथील सरपंच श्री. किरण बांदूरकर, श्री. सुरज तोतडे, श्री. सचिन टिपले, सौ. सविता कोवे, सौ. तनुश्री बांदूरकर, श्रीमती वर्षा ताजने, यमुनाताई राजूरकर, रमेश खवसे उपस्थित होते.
या कार्यक्रमात महिला दिनाबाबत मार्गदर्शन केले तसेच महिलांचे आजच्या जीवनातील स्थान काय आहेत महिलांना सशक्त करण्यासाठी काय करावे लागतात याबाबत पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. महिलांचे मनोरंजन करण्यासाठी विविध खेळ व स्पर्धा घेतल्या आणि विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी ३६०० महिला सहभागी होत्या कार्क्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. अश्विनी खोब्रागडे, सौ. लता बावणे, सौ. मनीषा बरडे, सौ. प्रिया पिंपळकर, सौ. ममता मोरे यांनी प्रयत्न केले.