वढा तिर्थक्षेत्रासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार
आ. जोरगेवार यांनी सपत्नीक केली विठ्ठल रुग्खमाईची महाआरती
विदर्भातील पंढरपूर समजल्या जाणा-या वढा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याबदल वढा येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वढा येथील विठ्ठल रुक्मिणीची आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक महाआरती केली.
यावेळी कल्याणी किशोर जोरगेवार, वढा येथील संरपच किशोर वराडकर, माजी सरपंच सुनिल निखाडे, पांढरकवडा सरपंच सुरेश तोतडे, साखरवाही सरपंच निरज बोंढे, नागाडा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेंडे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण संघटक मुन्ना जोगी, युवा नेते अमोल शेंडे, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, सविता दंढारे, आदिवासी विभाग जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, विमल कातकर, अल्का मेश्राम, माधुरी निवलकर, वैशाली मेश्राम, माधूरी काळे, आशु फुलझेले, रुपा परसराम, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, कार्तिक बोरेवार, पांढरकवडा सरपंच सुरेश तोतडे, आदींची उपस्थिती होती.
वढा तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. निवडून आल्यानंतर वढा येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर तिर्थक्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प केला होता. या दरम्यान त्यांनी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपूरावा सुरु ठेवला होता. या काळात सत्तापरिवर्तन झाले. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांचा पाठपूरावा सुरुच राहिला. दरम्यान नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा तिर्थक्षेत्राच्या प्रलंबित मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर सदर विकासकार्यासाठी 25 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभागृह, प्रशासकीय इमारत, पूजा शेड, घाट बांधकाम, छत्री, विसर्जन कुंड, जल निस्सारण, बायोडायजेस्टर, बाग काम यासह इतर सोयीसुविधातून मंदिर परिसराचा विकास होणार आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा येथे जात विठ्ठल रुख्मीनीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वपतत्निक आरती केली. यावेळी निधी उपलब्ध करुन दिल्याबदल ग्रामस्थांच्या वतीनेही आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. हे ठिकाण पवित्र आहे. या तिर्थक्षेत्राचा विकास करण्याचा संकल्प आपण केला होता. आता आपल्याल्या या विकासकामासाठी पहिल्या टप्यात 25 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हि विठ्ठलाचीच कृपा आहे. आपण केवळ निमित्त आहोत. या निधीतून वढा तीर्थक्षेत्राचा दैदिप्यमान विकास होईल असा विश्वास मला असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या प्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.