अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड तर्फे जिल्हा परिषद शाळा मानोली येथे शेड बांधकामाचे भूमिपूजन
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आजूबाजूच्या गावाचा विकास करीत असताना सरकारी शाळेच्या विकासाकडे नेहमी लक्ष देत असते.मानोली गांवतील जिल्हा परिषद शाळेत एकूण 90 विध्यार्थी गेल्या अडीच वर्षा पासून रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 वाजेपर्यंत शाळेच्या आवारात बसून अभ्यास करतात त्यावेळी त्यांची पाणी, पाऊस, वारा व थंडी या पासून सुरक्षा व्हावी व सांस्कृतिक कार्यक्रमांस त्याना शेड चा फायदा व्हावा हे लक्षात घेत जिल्हा परिषद शाळा मानोली च्या आवारात शेड बांधकामाचे माणिकगड ने ठरविले व त्याचे भूमिपूजन गावच्या सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळेस शालेय व्यवस्थापान समिती सदस्य गांवातील प्रतिष्टीत नागरिक तसेच मुख्याध्यापक जी. व्ही. पवार, विषय शिक्षक, राजेश पवार, साहाय्यक शिक्षक वनपाल सोयाम व शिक्षिका सिता मेश्राम, प्रतिभा रायपुरे मॅडम आनी विध्यार्थी उपस्थित होते.
या शेड बांधकामा बद्दल सर्व शिक्षक वर्गानि माणिकगडचे आभार मानले. या शेड बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सी. एस. आर. टीम ने अथक प्रयत्न केले.