कोरोना जनजागृती काव्यधारा – ६
कवी – दीपक शिव, आनंदवन
कविता : जबाबदारी
जबाबदारीची जाणीव झाली…
दोन मिनिटे घरातल्या घरात
श्रध्दांजलीसाठी ऊभे राहिलो
तेव्हा…..
अजूनही गडद अंधारात
भिरभिरतात डोळे,
सॆरभॆर झालेली गावे
पाहताना….
कोरोनाच्या बीज ऋतूभार
ग्रहणाची घ्यावी लागणार
खबरदारी….
विस्कटलेले अवकाश
बधीर झाल्या
सा-याच भावना…..
खचखचून भरली इस्पितळे
आणि बेड्स अन् त्यात
ज्ञात अज्ञाताचा मोक्ष
मृतात्माचा चेहरा बघताना
मॊन होते दुःख …..
झुकलेली मान चाचपडते
अस्वस्थ पर्यावरणाचा तोल सावध
तशाच अवस्थेत ……
माझे कुटुंब हेच माझे सर्वस्व…
सा-या संवेदना अन् परिश्रमांची फूललेली बाग…..
जपावी लागणार आरोग्य सेवा….
पथक येती घरा
कोलाहल थांबेल मानवी वस्तींचा …..
जबाबदारीची झाली हो जाणीव
पराभव होईल कोरोनाचा…
संदेश एक
वापरा मास्क अन् सॅनिटायझर,
ठेवा सुरक्षित अंतर…
एक्सपायरी नाही
कदाचित पुढचा साराच प्रवास…
कवी : दीपक शिव
आनंदवन, वरोरा
९८२२२४००१२
(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)
•••••••