17 युनियनमधील ४ हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांची सिएटीपीएसच्या अधिका-यांशी बैठक

0
372

17 युनियनमधील ४ हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांची सिएटीपीएसच्या अधिका-यांशी बैठक

बंद असलेल्या बंकरच्या कंत्राटचे होणार नुतणीकरन, कामगारांना मिळणार काम

सिएसटीपीएस येथील 17 संघटने अंतर्गत कार्यरत 4 हजार कामगारांच्या विविध मागण्यांना घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी सि एस टी पी एस च्या अधिका-यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बंकर कुकींग 5,6 आणि 7 चा कंत्राटाचे नुतणीकरण करुन येथे कामगारांना पुर्वरत कामावर घेण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. त्यामूळे येत्या 20 दिवसात कामारुन बंद करण्यात आलेल्या सर्व कामगारांना काम मिळणार आहे.
17 युनियन सह पहिल्यांदास हिराई विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला सिएटीपीएसचे मुख्य अभियंता गिरीश कुमरवार, उपमुख्य अभियंता डॉ. भुषण शिंदे, शाम राठोड, प्रफुल कुटेमाटे, फनिंद्र नाखले, वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक बाहुबली दोडल, अधिक्षक अभियंता महेश राजूरकर, मिलींद रामटेके, समाज कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, उप महाव्यवस्थापक हिना खय्याम, यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे हरमन जोसेफ, युवा नेते अमोल शेंडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, करणसिंह बैस, प्रसिद्धी प्रमुख नकूल वासमवार, ताहिर हुसेन, गौरव जोरगेवार, कार्तीक बोरेवार, राम मेंढे, यंग चांदा ब्रिगेडचे विज कामगार सेनेचे प्रकाश पडाल, करण नायर, नितिन कार्लेकर, शकील शेख, उमेश नागपूरे, अशोक ठाकरे आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूरातील औष्णिक विद्युत केंद्र राज्याला विज पूरवतो. येथील कामगारांमूळे हे शक्य होत आहे. अशात येथील कामगारांच्या समस्यांकडे आपण प्राधाण्याने लक्ष दिले पाहिजे. कामगारांना सन्मानजनक वागणून आपण दिली पाहिजे. त्यांना योग्य सोयी सुविधा व सुरक्षा साधने नियमित दिल्या गेली पाहिजे आज येथील संपूर्ण 17 युनियन चे पदाधिकारी आहेत. जवळपास 4 हजार कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. हा कामगार महत्वाचा घटक असुन त्यांच्या समस्या गांभिर्याने घेण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत संबधित अधिका-यांना केल्या आहे.
कामगार बेरोजगार होणार नाही यासाठी जुना कंत्राट संपण्याच्या तिन महिने अगोदर नवीन कंत्राट प्रक्रिया सुरु करण्यात यावी, जोशी कमेटीच्या अहवाला नुसार वर्क ऑर्डर नुसार गेट पास देण्यात यावे, कंत्राटी कर्मचा-याची दर वर्षी पोलिस व्हेरिफीकेशन ची अट रद्द करुन दोन वर्षातुन एकदाच कामगाराला पोलिस व्हेरिफीकेशन मागण्यात यावे, कंत्राटदारांमार्फत कामगारांचे वेतन वेळेवर करण्यात यावे, ए. एम. सी टेंटरमधून अॅजनमेन हा शब्द वगळण्यात यावा, संच 8 आणि 9 हा महानगर पालिका हद्दीत येत असल्याने येथील कामगारांना महानगरपालिका वेतनश्रेनी नुसार वेतन अदा करण्यात यावे अशा सुचना सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएसच्या अधिका-यांना केल्या आहे. या बैठकीला सिएसटीपीएसच्या अधिका-यांसह सिटु, जनरल वर्कस युनियन, भारतीय कंत्राटी कामगार सेना, म.रा.वि.नि.रो.मज. सेना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना, महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार संघ, प्रावर फ्रंट का. संघटना, महाराष्ट्र राज्य बहुजन कामगार संघटना, उलगुलान विद्युत कंत्राटी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्यूत कंत्राटी कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य कामगार सेना आदी युनियच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here