अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड तर्फे नाली बांधकामाचे भूमिपूजन
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ समाजाच्या विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील स्वच्छतेकडे लक्ष देत, मानोली गांवतील नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देत नाली बांधकामचे काम मंजूर केले. आज या नाली बांधकामाचे भूमिपूजन मानोली गावचे सरपंच यांच्या हस्ते कुदल व नारळ फोडून करण्यात आले. या प्रसंगी गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नागरिक व गांवतील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. या नालिमुळे गांवतील पुष्कळशी घाण वाहून जाण्यास मदत होईल असे प्रतिपादन उपस्थित नागरिकांनी केले व माणिकढचे आभार व्यक्त केले.
या नाली बांधकाम कार्याला सुरवात करण्याकरिता माणिकगढ च्या सीएसआर टीम ने अथक प्रयत्न केले.