शाळेचे विद्यार्थी सोयी सुविधे अभावी त्रस्त लोकप्रतिनिधी करोडोचे महोत्सव करण्यामध्ये व्यस्त आप चे राजू कुडे यांचा आरोप
चंद्रपूर : शहरात मनपाच्या अनेक शाळा या कोसळन्याच्या अवस्थेमध्ये आहे. गरीब विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे जिथे विद्यार्थ्यांची पट संख्या क्षमते पेक्षा जास्त असून सुद्धा विद्यार्थी सोई सुविधेपासून वंचित आहे. आप चे युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पार्टी ने सर्वे केला असता अनेक शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठे ही आढळली नाही. सोबतच शौचालय सुद्धा नव्हते ज्यामुळे विदयार्थ्यांना शाळेच्या मधल्या सुट्टीत घरी जावे लागत असल्याचे अनेक विद्यार्थ्याने कळविले. काही शाळेत विद्यार्थी संख्या अनुसार शिक्षकांची संख्या नसल्याने एका शिक्षकाला 3 वर्ग सांभाळण्याची वेळ आली असल्याचे दिसले.
या सर्व शाळेमधून बाबुपेठ येथील डॉ आंबेडकर शाळा आणि इंदिरा नगर येथील शाळा याची दैयनीय अवस्था असून येथे केव्हाही घातपात होऊ शकते. अशी माहिती सर्वेच्या आधारावर मनपाच्या अधिकाऱ्यांनी कळविले. त्यानंतर कुठलीही कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मनपा समोर आंदोलन करण्यात आले. त्यांनतर अधिकाऱ्यांकडून निधी नसल्याचे कारण पुढे आले. शहरात विविध इव्हेंट करायला निधी उपलब्ध आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणा करीता निधी नाही यामुळे विद्यार्थी पालकांकडून रोष व्यक्त केले जात असून येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू असे बोलले जात आहे. मनपात असलेला विरोधी पक्ष मूग गिळून का बसलेला आहे हे सुद्धा न समजणारे कोडे आहे.