लोहार, गाडी लोहार व तिच्या सर्व तत्सम उपजातींना पूर्ववत आदिम जमातीच्या सवलती लागू करा…
चिमूर तालुका लोहार समाजाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन…
चिमूर, १ मार्च : लोहार, गाडी लोहार व तिच्या इतर सर्व उपजमाती मधील कुटुंब अत्यंत मागासलेले असून निकृष्ट व हलाकीचे जीवन जगत आहेत . या समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात कुठलाही विकास आजपर्यंत झालेला नाही. त्यामुळेच मध्यप्रांत, वऱ्हाड राज्याचे 1941 व 1958 च्या आदेशानुसार लोहार जमातीला आदिम जमाती (ST) च्या सवलती लागू केलेल्या होत्या. लोहार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण पूर्ववत सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याने लोहार, गाडी लोहार व तस्सम जाती समाज संघटना तालूका शाखा चिमूर च्या वतीने तालूका अध्यक्ष सारंग उर्फ पुरुषोत्तम दाभेकर यांच्या नेतृत्वात लोहार गाडी लोहार व तिच्या सर्व तस्सम जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आदिम जमतीच्या (ST) च्या सवलती तात्काळ सुरु करण्यात याव्या याकरिता अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर च्या मार्फतीने माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय सचिव समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना आज दिनांक 1/3/2024 रोज शुक्रवार ला निवेदन देण्यात आले.
सन 1976 च्या अनुसूचित जाती-जमाती सुधारणा आदेशा द्वारे लोहार जमात अनुसूचित जमाती मधून वगळण्यात आली होती. परंतु याच यादीमध्ये “कमार” जातीचा उल्लेख क्रमांक २० वर केलेला आहे. “कमार” म्हणजेच “लोहार” अशी नोंद समाज शास्त्रीय व मानव वंश शास्त्रीय जुन्या दस्त ऐवजात नमूद असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने 1976 च्या अमेंडमेंट मध्ये “कमार” जमातीच्या तत्सम जमाती म्हणून महाराष्ट्रातील लोहार, गाडी लोहार व इतर तिच्या सर्व उपजातींचा समावेश करून पूर्वीचे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण पूर्ववत सुरू करावे व लोहार समाजावर झालेला अन्याय त्वरित दूर करावा अशी शासनाला निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. सरकारचे आश्चर्य म्हणजे लोहार ही जात भारतातील वेगवेगळ्या प्रांतात एससी, एसटी, ओबीसी व एनटी अशा सर्वच जातीच्या वर्गवारी मध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा घोळ सुद्धा दूर करावा व आदिम जमात म्हणून सबंध भारतात एकाच जात वर्गवारी मध्ये लोहार जातीला समाविष्ट करण्यात यावे. अशीही निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदन सादर करतांना चिमूर तालूका लोहार संघटनेचे सचिव गुरूदास सोनटक्के, कार्यकारनी सभासद मुरलीधर चुनारकर, दीपक बावणे, दिवाकर दाभेकर, नीलकंठ बावणे, तालूका महिला प्रतिनिधी सौ. मनीषा बावणे यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.