पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चुनाळा माणिकगड रेल्वे स्टेशन येथील रेल्वे अंडरपास पूलाचे ऑनलाईन उद्घाटन
राजुरा, 26 फेब्रु. 2024 : आज चुनाळा माणिकगड रेल्वे स्टेशन येथील गेट नं. 95 येथे 2 कोटी 40 लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रेल्वे अंडरपास पूलाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाले.
अशाप्रकारच्या देशात रेल्वे विभागानी बांधलेल्या तब्बल 1500 अंडरपास व ओव्हरब्रिज चे सुध्दा उद्घघाटन करण्यात आले. मुख्य अतिथी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आपल्या मनोगतातून रेल्वे अधिकाऱ्यांना उद्घघाटन झालेल्या पुलात पाणी साचणार नाही यावर त्वरीत मार्ग काढावा, या पुलातून शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना विज जोडणी करिता केबल टाकण्याची परवानगी म.रा.वि.वि.कं. ला त्वरीत देण्यात यावी व कागजनगर पर्यंत येणाऱ्या प्रवासी रेल्वे ट्रेन मनिकगड पर्यंत सुरू कराव्या अशी मागणी करून यासंबंधीचे निवेदन दिले.
याप्रसंगी रेल्वे चे डी.आर.यू.सी.सी. मेंबर पुनम तिवारी, जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, राजुरा न.प. माजी अध्यक्ष अरुण धोटे, चुनाळा ग्रा.प. चे सरपंच बाळू वडस्कर, बामणवाडा सरपंचा भारती पाल, भाजप जिल्हापदाधिकारी अरुण मस्की, सतिश धोटे, रेल्वे अधिकारी श्री. ए. गोपी, श्री. नवनीत कुमार सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला चुनाळा येथील शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.