25 फेब्रुवारीला रविवारी चला आठवणीच्या गावात पारंपारिक खेळांच्या क्रीडा उत्सवाचे आयोजन

0
379

25 फेब्रुवारीला रविवारी चला आठवणीच्या गावात पारंपारिक खेळांच्या क्रीडा उत्सवाचे आयोजन

आमदार किशोर जोरगेवार यांची संकल्पना, महिलांसाठी 17 पारंपारिक खेळांची मेजवानी

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून 25 फेब्रुवारीला रविवारी चला आठवणीच्या गावात या पारंपारिक खेळांच्या क्रीडा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. आझाद बागेत आयोजित या क्रीडा उत्सवात महिलांसाठी पारंपरिक 17 प्रकारचे खेळ खेळल्या जाणार असून विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे वितरित केल्या जाणार आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पेनेतून चंद्रपूरात श्री माता महाकाली क्रिडा महोत्सवाचे आयोजन केल्या जात आहे. क्रिकेट स्पर्धेने या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. नंतर गांधी चौक येथे बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कबड््डी आणि राज्यस्तरिय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना क्रिडा प्रेमी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान आता विशेष महिलांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने चला आठवणीच्या गावात या पारंपारिक खेळांच्या क्रीडा उत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या आयोजनाचे दुसरे वर्ष असून 25 फेब्रुवारीला रविवारी मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्या येथे दुपारी 2 वाजता सदर क्रीडा स्पर्धेला सुरवात होणार आहे. यात संगीत खुर्ची, फुगडी, मामाच पत्र हारवल, लिंबु चमचा, दोरीवरच्या उडी, लगोरी, तळ्यात – मळ्यात, बेडूक उडी, पोता उडी, दोन पायांची उडी, स्मरणशक्ती स्पर्धा, बटाटा शर्यत, रस्सीखेच, रांगोळी स्पर्धा, घागर स्पर्धा, पुजा थाळी सजावट स्पर्धा, पारंपारिक वेषभुषा स्पर्धा आदी स्पर्धांचा समावेश असणार आहे. या सर्व स्पर्धा 18 ते 30, 31 ते 45, 46 ते 60 आणी 60 वर्षांवरील अशा चार गटात पार पडणार आहे. तर येणा-या प्रेक्षकांसाठी टायर चालवणे, फुगा बंदुक, रिंग फेकणे हे खेळ मनोरंजक खेळ ठेवण्यात आले आहे. तरी या खेळांमध्ये भाग घेण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here