संभाजी ब्रिगेड बल्लारपुरतर्फे शिवजयंती ची जय्यत तयारी
बल्लारपुर : भारतभुमीला ४०० वर्षांच्या राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन स्वतंत्र करणारे भारतभाग्यविधाता छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती जगभरात साजरी होत आहे. बल्लारपुर शहरात गेल्या दोन दशकांपासुन संभाजी ब्रिगेडची शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परंपरा राहिलेली आहे. यंदाही शिवजन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी सूरु असुन शहरात नागरिकांमध्ये त्याप्रती उत्साह दिसुन येत आहे. दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नगर परिषद स्थित शिवस्मारक येथे मानवंदना देण्यात येईल.
संध्याकाळी ४ वाजता शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजता झांशी राणी चौक येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन संभाजी ब्रिगेड बल्लारपुरतर्फे करण्यात आले आहे. दिनांक २० फेब्रुवारी ला संध्याकाळी ६ वाजता झांशी राणी चौक येथे पवनपाल महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे राहणार असून अध्यक्ष म्हणुन प्रसिद्ध नेत्रतज्ञ डाॅ चेतन खुटेमाटे राहणार आहे तर विशेष अतिथी म्हणून संभाजी ब्रिगेड जिल्हाप्रमुख डाॅ. प्रा. दिलिप चौधरी असणार आहेत.
यंदाच्या या शिवजन्मोत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष साहिल घिवे, कार्याध्यक्ष प्रशासन संकेत चौधरी, प्रवक्ता रोहित चुटे, शहरसचिव प्रतिक वाटेकर यांनी केले आहे.