रस्ता सुरक्षा कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्गुस व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती यासारखे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे , याच माध्यमातून रस्तावर चालत असताना अपघात किंवा रस्ता सुरक्षा नियम काय आहेत, कायद्यात नियम काय आहेत ?याची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने शासकीय आय टी आय चंद्रपूर येथे रस्ता सुरक्षा कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर, वाहतूक पोलिस कार्यालय व लॉयड्स मेटल येथील अधिकारी सुद्धा सहभागी झाले आणि या सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियम, वाहतुकीचे नियम, स्वतःची सुरक्षा कशी करायची व परिवहन कार्यालयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केल. तसेच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी रस्ता सुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि स्पर्धेचे जे विद्यार्थी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले अशा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले .
या कार्यक्रमाचे उदघाटन कु. नाम्रपाली गोंडाने ( व्यवस्थापक लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन) यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राजरत्न वानखेडे ( प्राचार्य शासकीय आय टी आय चंद्रपूर ) ,प्रमुख पाहुणे म्हणून श्री आनंद मेश्राम ( सहायक प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर ), श्री शिवाजी विभुते ( सहायक प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर) श्री अंशुल मुर्डीव ( सहायक प्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर) श्री राजेंद्र वाघमोडे ( सहाय्यक निरीक्षक वाहतूक पोलिस कार्यालय) श्री रामभाऊ राठोड श्री. रमेश राधाराम ( वरिष्ठ व्यवस्थापक लॉयडस ) , श्री विपीन रायकवार ( सहायक व्यवस्थापक सुरक्षा व पर्यावरण विभाग लॉयडस ) प्राध्यापक श्री जितेंद्र टोंगे, प्राध्यापक श्री बंडुपंथ बोढेकर, श्री अनुराग मत्ते, श्री सुरेंद्र वासेकर , आय टी आय चे प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते या कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री आनंद मेश्राम,श्री शिवाजी विभुते, श्री अंशुल मुर्डीव, श्री राजेंद्र वाघमोडे यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयचे नियम काय आहेत लायसन्स नसेल तर काय कार्यवाही होऊ शकते ? कागद पत्रे कशे काढायचे, वाहतुकिचे नियम , दंड किती आकारला जातो कुणावर गुन्हा दाखल होतात याबाबत संपूर्ण माहिती या सर्वानी विद्यार्थ्यांना दिली तर स्वतःची औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा कशी करायची कोणत्या उपकरणाचा वापर कसा करायचा रस्त्यावरून चालताना काय काळजी घ्यायची याबाबत संपूर्ण माहिती कंपनीचे अधिकारी श्री. रमेश राधाराम श्री विपीन रायकवार यांनी दिली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री जितेंद्र टोंगे यांनी केले .