वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गडचांदूर नगर परिषदेला कर वाढ विरोधात दिले निवेदन
कोरपना : नगर परिषद गढचांदूरच्या कर विभागाद्वारे 12 जानेवारी 2024 च्या नोटीस नुसार गडचांदूर येथील जनतेला आकारण्यात येणारा वाढीव कर रद्द करण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडी गडचांदुर शहराचे अध्यक्ष प्रसिद्ध रामटेके आणि जिल्ह्याचे संघटक दिव्यकुमार बोरकर, तालुका कोरपनाचे सल्लागार मधुकरजी चुनारकर, यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
करवाढीच्या विरोधात निवेदन देताना खालील मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.
१) गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील जनतेचे वास्तव्य/ ठिकाण /खुला भूखंड/ व्यवसाय ठिकाण यांचा जो मोजमाप केलेला होता तो मोजमाप कर वाढीसाठी आहे. याची जनतेला प्रथम जाहिरातीद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे माहिती दिली नाही.
२) गडचांदूर नगरपरिषद सोडता गडचांदूरला तालुका दर्जा किंवा जिल्हा दर्जा आहे का? असा कुठलाही दर्जा नसताना कर का वाढवण्यात आले.
३) गडचांदूरच्या जनतेला या प्रकारे कर लावता तर गडचांदूर हद्दीत माणीकगड सिमेंट कंपनी आहे त्या कंपनीचे सर्व मोजमाप झाले आहे काय? आणि त्यांना किती कर लावल्या जातो याचा जनतेला खुलासा द्यावा.
४) लावलेला वाढीव कर नगर विकास मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार लावलेला आहे काय?
५) लावलेला वाढीव कर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशाने केलेला आहे काय?
६) गडचांदूर हे गाव अतिदुर्गम भागात येत असून अगोदरच इथे बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्यात जीवन यापण करणारी जनता आहे.
७) गडचांदूरला नगरपरिषदेची शाळा नसताना शिक्षण कर का लावण्यात आला?
८) गडचांदुर येथील जनतेला आपल्या कार्यालयातून खालील सुविधा नसताना कर लावण्यात आलेला आहे. (अ)रोजगार हमी योजना ( ब) वृक्ष कर (क )पर्यावरण कर
९) इथे अगोदरच पर्यावरणाचे दिवाळे निघाले आहे व जनतेचे वयोमान कमी करण्यात आपला मोलाचा वाटा आहे. तरीसुद्धा पर्यावरण कर लावलेला आहे.
१०) लावलेला वाढीव कर नगरपरिषद प्रतिनिधी यांनी बहुमताने ठराव मंजूर करून लावलेला आहे काय.
११) आपण काढलेल्या नोटीस मध्ये जनतेच्या नावाची त्यांच्या एकूण भूखंडाची पूर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे. याचा आपल्याकडे दस्तावेज नाही काय?.
वरील सर्व मुद्द्याचा आपण गांभीर्याने विचार करावा. अगोदर जनतेला नगरपरिषदेने मूलभूत सुविधा द्यावे नंतरच वाढीव कर लावावा अन्यथा जनतेच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन वंचित बहुजन आघाडी द्वारे आपल्या कार्यालयावर जनतेच्या हितासाठी आंदोलन /मोर्चा /धरणे/ उपोषण करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील अशी सूचनाही दिली.
यावेळी पक्षाचे तालुका महासचिव राहुल निरंजने, तालुका उपाध्यक्ष विकी खाडे, राहुल बोरकर, साजिद शेख, समाधान सोनकांबळे, सुरज ताडे, सुदोधन खैरे, बंडू नळे, आमने साहेब तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी बेबीताई वाघमारे, जयाताई खैरे, सुजाताताई वाघमारे पक्षाचे बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.