घुग्घुस येथील जनता विद्यालय येथे प्राथमिक उपचार प्रशिक्षण कार्यशाळा
पंकज रामटेके
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस व लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामाजिक दायित्व विभागांतर्गत आरोग्य,शैक्षणिक,महिला सक्षमीकरण,सामाजिक जनजागृती यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहे,दैनंदिन जीवनात छोटे मोठे अपघात होत असतात. अशा वेळी अपघात ग्रस्त व्यक्तींना किंवा रुग्णांना काय प्राथमिक उपचार करायचे याबाबत आपदा प्रतिक्रिया बल यवतमाळ यांच्या सहयोगाने प्राथमिक उपचार प्रशिक्षण कार्यशाळा जनता विद्यालय घुग्घुस येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्ध्यांना प्राथमिक उपचार कसा करायचा त्याबाबत माहिती देणे. तसेच गरज पडल्यास रुग्णाला कशी मदत करायची याबाबाबत प्रात्यक्षिक करून दाखविली
या कार्यक्रमाचे उदघाटन कु. नाम्रपाली गोंडाने(व्यवस्थापक लॉयड्स इन्फिनिट फॉउंडेशन),यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.व्ही.टी.पोले (प्राचार्य जनता विद्यालय घुग्घुस),तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक शासनाचे आपदती व्यवस्थपणाचे अधिकृत प्रशिक्षक तथा TDRF संचालक श्री. हरिचंद्र राठोड ,पाहुणे म्हणून श्री ताजने सर ,श्री.अभिषेक राजहंस (प्रशिक्षक), मुस्कान सैय्यद (प्रशिक्षक) श्री अनुराग मत्ते, मो.जिलानी,शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमाचे उदघाटक कु. नाम्रपाली गोंडाने यांनी विद्यार्थाना, तुम्ही भारत देशाचे भविष्य आहात, त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने जीवनात मार्ग ठरवायचा आहे याचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाचे मार्गदर्शक श्री हरिचंद्र राठोड यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार बाबत प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविली व विद्यार्थ्यांनी सुद्धा शिकवलेली प्रात्यक्षिकांचा सराव सुद्धा केला.