जिल्हा स्काऊट-गाईड मेळावा अंतर्गत तर्फे घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालय शाळेचे घवघवीत यश
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
“स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा” चंद्रपूर भारत सरकार आणि गाईड्स जिल्हा कार्यलय चंद्रपूर व बहुजन हिताय फाउंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विधमान संस्था स्मृती विहार पदमापूर ता.जि.चंद्रपूर येथे दि.२९ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ ला स्काऊड गाईड जिल्हा मेळावाचे आयोजन करण्यात आले.या स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा मध्ये सहभाग करण्याकरिता आमची सुंदर शाळेची – प्राचार्य मा.अनू खानझोडे यांच्या मार्गदर्शनात मध्ये प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस येथील २७ विद्यार्थींनी सहभाग नोंदविले.या विद्यार्थीनीनी नेतृत्व करण्याचे काम मा. उमादेवी लाहकरी व वैशाली जोशी यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक पालकमंत्री मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा.आ.किशोरभाऊ जोरगेवार, मा.श्री.विवेक जाॅन्सन यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती. शिक्षण अधिकारी (प्राथ) मा.श्री.राजकुमार हिवारे,कल्पना चावला, रामपाल सिंग, सुर्यकांत खनके, वनिताताई आसुटकर, आम्रपाली अलोणे आदि मान्यवर उपस्थित होते. स्काऊट-गाईड जिल्हा मेळावा उपक्रम अंतर्गत विविध सांस्कृतिक महोत्सव,शेकोटी कार्यक्रम व भव्य शोभायात्रा महोत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
स्काऊट-गाईड मेळावा द्वारे विद्यार्थींनी सुसंस्कार, देशभक्ती, देशप्रेम,उत्तम सेवा देण्याचे प्रशिक्षण आफसात केले. विद्यार्थी द्वारे प्रथोमप्रचार,संचालन,गॅजेड, तंबू निर्मिती, शारिरिक कवायत, सामाजिक संदेश,जनजागृती शोभायात्रा, साहसिक खेळ असे अनेक स्पर्धा द्वारे प्रस्तुत करण्यात आले.
शाळेतील स्काऊट-गाईड कॅप्टन मा.उमादेवी लाटकरी यांच्या मार्गदर्शना मध्ये प्रियदर्शिनी कन्या विद्यालय येथील स्काऊट-गाईडचा विद्यार्थींनी विविध स्पर्धेत भाग मध्ये सहभाग घेतला आणि गॅजेड स्पर्धा, भव्य शोभायात्रा, मानोरा,प्रथमोपचार स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक मिळविले.
स्काऊट-गाईड परिसरला भव्य सुंदरसे रुप देण्यात आले.परिसर मध्ये सुंदरसे तंबू विद्यार्थिना राहण्याकरिता बनविण्यात आले.त्याला भव्य सुंदर सजावट फुला द्वारे व सुविचार द्वारे करण्यात आले.मा.लाटकरी मॅडम यांच्या नेतृत्वात व मा.प्राचार्य अनु खानझोडे यांच्या मार्गदर्शना मध्ये भव्य देखनीय अशी शोभायात्रा व नृत्य सादर करण्यात आले.
जिल्हा स्काऊट-गाईड बक्षिस वितरण कार्यक्रम मा.शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले.व प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस येथील विद्यार्थींनीनी सहा (६) पैकी पाच (५) प्रथम पारितोषिक देण्यात आले.