घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालयच्या विद्यार्थिनींनी चित्रातून तयार केल्यात बोलक्या भिंती

0
436

घुग्घुस येथील प्रियदर्शनी कन्या विद्यालयच्या विद्यार्थिनींनी चित्रातून तयार केल्यात बोलक्या भिंती

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे व इन्फिनिट फाउंडेशन च्या माध्यमातून घुग्घुस येथील श्री.साईबाबा ग्रामीण विकास संस्था,गडचिरोली अंतर्गत प्रियदर्शनी कन्या विद्यालय येथील शाळेच्या कम्पाउंट वाॅलवर विविध वैज्ञानिकांची,समाजसेवकांची तसेच विविध क्षेत्रातुन नावलौकीक प्राप्त मान्यवरांचे चित्रे काढून संपूर्ण परिसर बोलका केल्याने येथे सकाळी फिरणार्या व्यक्तींचे प्रमाण अलीकडे वाढलेले बघायला मिळत आहे.

सदर शाळेच्या शैक्षणिक, सामाजिक व बौध्दीक विकास घडून उत्तम विद्यार्थीनी घडाव्यात या उत्दात्त हेतुने लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीने सदर शाळेला दत्तक घेवुन विद्यार्थिनींनी शैक्षणिक साहित्य व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात.चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थीनीनी आपले कलागुण दाखविले व चित्र काढून लाइट्स मेटल्स कंपनीचे कर्मचार्यांसबोत रंगवून सुध्दा त्यात जिवंतपणा आणला.
यावेळी एक मिनी गेम शो,गायन,नाटीका सादर करण्यात आल्यात.स्पर्धेत अव्वल असलेल्या विद्यार्थीनींना शाळेचे प्राचार्य अनु खानझोडे यांच्या अध्यक्षतेखाली लाॅयड्स मेटल्स कंपनी उद्योगाचे सी.एस.आर व्यवस्थापक नम्रपाली गोंडाणे,उत्पादन विभाग प्रमुख गुणाकार शर्मा,रमेश राधेराम, संतोष कोसारे, दिपक गौरकार, संजय देरकर, पंचशील लोखंडे, रणविरकुमार सिंग,कौस्तुभ कासलीकर,प्रविण लोणारे यांचे प्रमुख उपस्थितीत पारितोषिक व स्मृतीचिन्ह वितरीत केलेत.
कार्यक्रमाचे संचालन सश्मी मॅडम यांनी केले, तर आभार पायल मॅडम ने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here