भूरकुंडा बूज येथील डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा
राजुरा: दि. ३० जानेवारी २४ पासून तालुक्यातील रानवेली फाटा ते भूरकुंडा बूज पर्यंत येथे मे. यंग कन्सट्रक्शन चंद्रपुर, ठेकेदार जी. टी. सिंग यांच्या माध्यमातून सदर डांबरीकरनाचे काम चालू असून ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व प्रतीचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे हा रस्ता भूरकुंडा बूज येथील ग्रामीण भागातील मुख्य रस्ता असून त्याच मुख्य रस्त्याचे काम खूपच दयनीय अवस्थेत बेधुंद निकृष्टरित्या चालू आहे. ठेकेदार व सुपरवायजर या रस्त्याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे.
सदर रस्ता हा डांबरीकरन सारखा कोणत्याही प्रकारे वाटत नाही. दुचाकी वाहने जातानाच त्या रस्त्याला खरदडपणे खड्डे सारखे अनुभव येत आहे. रस्त्याचे बांधकाम रात्रीच्या वेळेस चालत असून कामाचे नियम धाब्यावर ठेवून असा निकृष्ट रस्ता बनवण्यात योगदान दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक लोक या रस्त्याने ये-जा करतात. त्या रस्त्याला कोणत्याही प्रकारची सीलिंग कोट जाळीचा स्तर कदापि दिसतच नाही. काय टाकत आहे त्यांनाच ठाऊक आहे. जिल्हा परीषद बांधकाम विभागाने व स्थानिक प्रशासनाने या डांबरीकरण रस्त्यात जातीने लक्ष घालून त्यावर योग्य रस्ता बनवण्यात योग्य भूमिका बजवावी हीच समस्त भूरकुंडा बूज ग्रामस्थ वासियांची विनंती असून सदर रस्ता उच्च प्रतीचा होऊन जनता व शेतकरी वर्गाना चांगल्या प्रतीच्या रस्त्याचे डांबरीकरण काम योग्यरीत्या होणे गरजेचे आहे.