यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

0
423

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना पूष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमूख सविता दंडारे, युवा नेते अमोल शेंडे, सायली येरणे, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, राशिद हुसेन, प्रसिध्दी प्रमुख नकुल वासमवार, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, देवा कुंटा, मुकेश गाडगे, आशा देशमूख, गोपी मित्रा, विनोद अनंतवार, आनंद रनशूर, चंद्रशेखर देशमूख, कार्तिक बोरेवार नितेश गवळी, शमा काजी, निलीमा वनकर, वैशाली मद्दीवार, वैशाली मेश्राम, आदींची उपस्थिती होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. चंद्रपूरातही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दोनही महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. दिप प्रज्वलन करुन कार्यकमाला सुरवात करण्यात आली. क्रांतिकारकांच्या देशभक्तीच्या आणि बलिदानाच्या संस्कारांनी पवित्र अशा भारतभुमीत आम्ही जन्मलो याचा अम्हाला अभिमान आहे. भारतीय पराक्रमी इतिहासात डोकावले तर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि  हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याचे नाव क्षणात डोळ्यांसमोर येते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपल्या प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगिकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्त्व होते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वात मला काम करता आले. त्यांचे नेतृत्व मोठे होते. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी लढा उभारला. त्यांनी सर्वसामान्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. राजकारणात पुन्हा असे नेतृत्व तयार होणे शक्य नाही असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

बंगाली कॅम्प येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात एलईडी अक्षरांचे लोकार्पण

बंगाली कॅम्प येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथील डिजिटल अक्षरांचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार किशोर जोरगेवार यांनी केलेल्या आर्थिक सहकार्याने येथे  12 अक्षरी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक हे एलईडी अक्षरे लिहण्यात आली आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त या अक्षरांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी डाॅ. अमोल पोद्दार, यंग चांदा ब्रिगेडचे बंगाली समाज शहर प्रमूख विश्वजित शाहा, माजी नगरसेवक मनोरंजन रॉय, संतोष चक्रवर्ती, डॉ. शर्मीला पोद्दार, क्रिष्णा कुंटु, बलराम सेन, प्रदीप शाहा, अमोल हलदर, मितेश घोष, सतनामसिंग मिरधा यांच्यासह शाळकरी मुलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here