बालपणी आईने सांगितलेल्या रामायण आणि महाभारतातील प्रसंगातून सामाजिक संस्कारासह समाजकार्याची प्रेरणा मिळाली – आ. किशोर जोरगेवार

0
440

बालपणी आईने सांगितलेल्या रामायण आणि महाभारतातील प्रसंगातून सामाजिक संस्कारासह समाजकार्याची प्रेरणा मिळाली – आ. किशोर जोरगेवार

प्रभाताई जोरगेवार यांच्या जयंती निमित्त साहित्य वाटप

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही कवी यशवंत यांची ओळ तंतोतंत सत्य आहे. आज माझी आई जगात नाही. मात्र प्रत्येक क्षणी ती स्मरणात असते. तिने बालपणात केलेले संस्कार हिच जोरगेवार कुटुंबीयांची खरी संपत्ती आहे. तिच्या संस्कारातुन आज जोरगेवार कुटुंब भक्कम उभे आहे. आईने बालपणी सांगितलेल्या रामायण, महाभारतातील प्रसंगातून सामाजिक संस्कारासह समाजकार्याची प्रेरणा मिळाली असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्व. प्रभाताई जोरगेवार यांच्या जयंती निमित्त सरदार पटेल महाविद्यालयातील सभागृहात स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने साहित्य वाटप करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुधाताई पोटदुखे, सचिव भरत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत, प्रा. श्याम धोपटे, प्राचार्य प्रमोद काटकर, कल्याणी किशोर जोरगेवार, आमदार किशोर जोरगेवार यांच्या बहिण उज्वला पार्लेवार, प्रसाद किशोर जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, माता महाकाली महोत्सव समीतीचे सचिव अजय जैस्वाल, योग नृत्य परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, गोपाल मुंधडा आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले. मला जन्म देणारी आणि माझे पालन पोषण करणारी अशा दोन आई आम्हाला मिळाल्या. यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. अत्यंत गरीब परिस्थितीत आम्ही बालपण जगले. नंतर स्वतःचा व्यवसाय सुरु केला. हलाकिच्या या परिस्थितीतही तीने कधी अप्रामाणीक होऊ दिले नाही. विचलीत होउन मिळालेल्या क्षणिक सुखा पेक्षा समाधानाची भाकर खाउन जगायची शिकवण तिने दिली. मी डॉक्टर व्हावे तिची इच्छा होती. पण ते परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. इंग्रजी माध्यममध्ये माझे शिक्षण तिला करायचे होते. मात्र फी भरण्यास आम्ही सक्षम नव्हतो. आईने वारंवार शाळा व्यवस्थापनाशी विनवनी केली. मुलासाठी आईचा आग्रह पाहुन शाळाचे संस्थापक, अध्यक्ष राजेंद्र खजानजी यांनी मला इंग्रजी माध्यमात दाखल करून घेतले. एका खाजगी शाळेत फी न भरता इंग्रजी माध्यमात शिकणारा कदाचित मी पहिला विद्यार्थी असेल असेही ते यावेळी आईंच्या आठवणी सांगताना म्हणाले. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली त्यावेळी राजेंद्र खजाजनी यांनी त्याकाळी मला १०० रुपयाची मदत केली होती असेही यावेळी बोलतांना ते म्हणाले.
मी राजकारणात जावे ही आईची इच्छा नव्हती. मात्र 2009 च्या निवडणूकीत मला पक्षाचे टिकीट मिळाले नाही. तेव्हा मी पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी काम केले. ते निवडुन आले. रात्रो विजय मिरवणूक निघाली. या विजय मिरवणुकीत सगळ्यांच्या समोर राहण्याच्या उत्सुकतेत मी मात्र मागे राहिलो. हे आईने पाहिले आणि तु नेहमी मागे राहतो, मात्र आता तु पूढे राहा, राजकारणात जा, मी असेल कि नसेल पण तू आमदार बनायचं हे वाक्य आईच्या तोंडून निघाले होते. माझ्या इच्छेसाठी तिने तिच्या ईच्छेविरोधात मला राजकारनात काम करायला सांगीतले हे केवळ आईच करु शकते असे ते यावेळी म्हणाले. त्यानंतर मी कधीही थांबलो नाही. कष्ट प्रामाणीकता आणि सेवा या तिच्या शिकवणी प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. आणी तो सदैव करेल असे ते या प्रसंगी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना व्हिल चेअर, प्लास्टिक मॅटिन, योग नृत्य परिवाराला ध्वनीक्षेपन संच आणि नरसिंह आखाडा बाबूपेठ व योग नृत्य परिवार यांना प्लास्टिक खुर्चीचे, गरज वंतांना उपयुक्त साहित्याचे तसेच क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना खेळउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्याम धोपटे व संचालन शिक्षिका सरोज चांदेकर यांनी केले यावेळी डॉ किर्तीवर्धन दीक्षित यांचेही मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेड व विविध सामाजिक संघटना नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here