घुग्घुस नगरपरिषद येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आगमन
दि. 18 /01 /2024 रोजी दुपारी 4.00 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे घुग्घुस नगरपरिषद येथे आगमन झाले. यावेळी नगरपरिषद चे मुख्यधिकारी जितेंद्र गादेवार यांनी फित कापून उद्घाटन केले आणि रथाचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून घुग्घुसचे पोलीस निरीक्षक श्री. आसिफराजा शेख,सहा.पोलीस निरीक्षक श्री.साखरे, बँक ऑफ इंडीया चे शाखा व्यवस्थापक श्री.वैद्य उपस्थित होते. यावेळी PM स्वनिधीच्या लाभार्थ्यांना धनादेश प्रदान करण्यात आले.
तसेच रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देण्यात आले. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यधिकारी यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक तसेच नगरपरिषदचे कर्मचारी उपस्थित होते.