वंचित बहुजन आघाडी ची तालुका स्तरीय बैठक संपन्न

0
600

वंचित बहुजन आघाडी ची तालुका स्तरीय बैठक संपन्न

 

कोरपना, 17 जाने. : तालुका स्तरीय बैठक वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखा व तालुका वतीने 14 जानेवारीला एरिकेशन गेस्ट हाउस अमलनाला रोड येथे पार पडली. वंचित बहुजन आघाड़ी चे कोरपना तालुका अध्यक्ष विजय खाडे यांच्या सेवा निवृत्त सत्कार कार्यक्रमाच्या निमित्त वंचित बहुजन आघाड़ी चे महाराष्ट्राचे प्रदेश सदस्य कुशल मेश्राम यांच्या उपस्थित यांच्या हस्ते खाडे सरांचा त्यांच्या पत्नीसह शाल आणि फुलांचा गुलदस्ता देउन सत्कार करण्यात आला.
दुपारी 2 वाजता बैठक पार पडली. तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते. तसेच वंचित बहुजन आघाड़ी ची महिला तालुका कार्यकारीणी आणि युवा तालुका कार्यकारीणीच्या मूलाखती घेउन चर्चा करण्यात आली. तसेच विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाड़ी मध्ये पक्ष प्रवेश घेण्यात आला.
वंचिताचे प्रेरणादायी बहुजनांचे उद्धारकर्ते संविधान अभ्यासक आदरणीय ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे हात कसे बळकट करता येईल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाड़ी ला सत्तेमध्ये कसे जाता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्ष डॉ. प्रा. सोमाजी गोंडाने चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष, अक्षय लोहकरे चंद्रपुर जिल्हा महासचिव, मधुकर उराडे, दिव्य कुमार बोरकर जिल्हा संघटक, कविता गौरकर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, शुभम मंडपे
जिल्हाध्यक्ष युवक आघाडी चंद्रपूर पश्चिम, मधुकर चुनारकर माजी तालुका अध्यक्ष, विजय खाडे तालुका अध्यक्ष, गौतम लोणारे अध्यक्ष युवा शहर आघाडी, आशा सोंडवले जिल्हा महिला आघाडी, बेबी वाघमारे जिल्हा महिला आघाडी, माया दुर्गे जिल्हा महिला आघाडी, प्रा.माधुरी ऊके यासह बैठकीला असंख्य कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
ही बैठक यशस्वी करण्याकरिता राहुल निरंजने तालुका सरचिटणीस, विक्कीभाऊ खाडे तालुका उपाधक्ष, सुनिल फुलझेले, शरद बोरकर, राज्यपाल बोरकर, शुद्धधन खैरे, सिद्धार्थ खैरे, रविंद्र उमरे, कोरपना पंकज निरंजने, सुरज ताडे गडचांदूर, मारोती बोरकर लखमापूर, श्री. आडे लोणी, धोटे मॅडम कोरपना, शिला निरंजने गडचांदूर, रत्नामाला वाघमारे गडचांदूर, संघर्ष गायकवाड हिरापूर, साजिद भाई गडचांदूर, नितीन खैरे गडचांदूर, घनशाम पिपरे गडचांदूर, बळीराम आळे अंतरगाव, विजय फुलझेले, सुरज जगताप, सुजाता निरंजने, वामनराव दुबे, सरोज ताई दुबे यासह असंख्य कार्यकर्ता आदिनी परीश्रम घेतले.
या बैठककिला कोरपना परिसरातील गडचांदूर, लखमापूर, अंतरगाव, हिरापूर, पारडी, परसोडा, सोनुर्ली, गांधीनगर, कोष्ठाळा, चनई , माथा, लोणी, आवाळपुर, विविध गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here