आम आदमी पार्टीने 96 जिल्हा पदाधिकाऱ्यांची केली घोषणा
चंद्रपूर, 15 जाने. : आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने विस्तारित चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. एकूण 96 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे नेते सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष, महासचिव, संघटन मंत्री अशा विविध पदांवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गडलेवार, सुरज ठाकरे,नावेद खान, मनोहर पवार, सुरज शहा, महासचिव पदी
संतोष दोरखंडे व प्रणित साहारे, संघटन मंत्री पदी योगेश मुरहेकर, भीवराज सोनी, शंकर सरदार अरोरा, डॉ. अजय पिसे यांचा समावेश आहे.
या शिवाय अमित बोरकर संघटन सहमंत्री, तर सह-सचिवपदी प्रा. किशोर दहेकर , प्रा. प्रमोद बुचुंडे श्रीकांत मुन, सोनल पाटील, चंदू माडुरवार, डॉ. अनिल वगलवार, सोशल मीडिया संयोजक राजेश चेटगुलवार, सोशल मिडिया सह-संयोजक क्रिश कपूर, मीडिया संयोजकपदी देवनाथ गंडाटे यांचा समावेश आहे.
या शिवाय विविध आघाडीत ऍड. प्रतिक विराणी प्रवक्ता, ज्योती बावरे महिला आघाडी (प्रभारी), राजू कुडे युवा आघाडी, ऍड. किशोर पुसलवार लिगल सेल, दिपक बेरशेट्टीवार शेतकरी आघाडी, ऋतिक पेंदोर अनुसूचित जमाती आघाडी, नासिर शेख अल्पसंख्यांक आघाडी, शंकर धुमाळे रिक्षा संघटना, मधुकर साखरकरसहकार आघाडी,सुरज ठाकरे कामगार आघाडी, महेंद्र धुमणे वाहतूक आघाडी, प्रा. उदय मोहीतकर शिक्षक आघाडी, ऍड. राजेश विराणी व्यापारी आघाडी, डॉ. सलीम तुकडी डॉक्टर्स आघाडी यांचा समावेश आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाची विस्तार कामगिरी आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्ह्यात मजबूत होत आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही पक्षाची कामगिरी आणखी वाढवू. आम आदमी पार्टीची विचारसरणी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” – जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार