घुग्घुस येथील बौध्द समाज बांधवांतर्फे गुरु श्री गुरु गोविंद सिंह शोभायात्रेचे जंगी स्वागत
शोभायात्रेत सहभागी शीखबांधवांना खीर वाटप
घुग्घुस येथे दि.१४ जानेवारी २०२४ रविवार रोजी शीख धर्माचे दहावे गुरु श्री.गुरु गोविंद सिंहजी यांच्या ३५८ व्या जन्मदिवसाचे निमित्ताने घुग्घुस शहरात महान नगर कीर्तन आयोजित करण्यात आले.
महा नगर कीर्तन शोभायात्रेचे गुरुद्वारा सिंह सभा घुग्घुस यांनी संपूर्ण बौद्ध समाजाला आमंत्रित केले होते.
शोभायात्रेत सर्व धर्म पक्षीय नागरिक मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित उत्साहात सहभागी होते.
त्यानिमित्त्याने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरीलचा परिसरातील बौद्ध समाज बांधवांतर्फे जंगी स्वागत शोभायात्रेचे केले,तसेच खीर वाटप करण्यात आले.