घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ जयंती
राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या जननी – विवेक बोढे
घुग्घुस : येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात शुक्रवार, १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, स्वराज्य स्थापनेचे बाळकळू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते.
शिवबांना लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. गरिब रयतेच्या सुखासाठी स्वतंत्र स्वराज्य बनवावे हि राजमाता जिजाऊंची इच्छा होती.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्या वैशाली ढवस, सुचिता लुटे,कामगार नेते सचिन कोंडावार,संतोष चिंत्तला, किरण फुलझले, जितू कुम्मरवार, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम व नागरिक उपस्थित होते.