विजासन लेणीतील तथागत भगवान गौतम बुद्धाची मुर्तीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करा
नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती व घुग्घुस बौध्द सर्कल समितीच्या वतीने पोलीस निरीक्षका कडे निवेदनातून मागणी
घुग्घुस येथील नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशीय समिती आणि
घुग्गुस बौद्ध सर्कल समितीच्या वतीने दि.१ जानेवारी २०२४ सोमवार रोजी घुग्घुस पोलीस स्टेशन जावुन पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांना निवेदनातून मागणी केली,कि भद्रावती येथील ऐतिहासिक विजासन लेणी येथे भगवान गौतम बुद्धाच्या प्राचीन मुर्ती आहे.
दि.३१ डिसेंबर २०२३ रविवार रात्रीला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावे. दोषींवर कारवाई न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समीतीचे अशोक (बंडू)रामटेके, बबलु सातपुते, हेमंत आनंदराव पाझारे,शाम कुम्मरवार, अमित बोरकर,भिमेंद्र कांबळे,सुजित सोनटक्के,गंगाधर गायकवाड, भारत साळवे,मनोहर कवाड़े,बाबा आमटे,अमृत सौदारी, नागेश पथाडे, पुजा दुर्गम,सविता मंडपे,माया सांड्रावार, सुप्रिया गाडगे, योगिता मुन, दिप्ती सोनटक्के,प्रांजली मुन,धीरज ढोके, सचिन वैरागडे, सुमेध पाटील व बौध्द बांधव उपस्थित होते.