राजुरा येथे भारुड भजन स्पर्धेचे उद्घाटन : भव्य दिंडी व भक्तीने दुमदुमली राजुरा नगरी
आमदार सुभाष धोटे मित्र मंडळाचे आयोजन
राजुरा (ता. प्र.) :- श्री. संत एकनाथ महाराज व श्री. दत्त जयंती चे औचित्य साधून इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा च्या भव्य पटांगणावर दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२३ रोजी दोन दिवसीय भारुड ढोलकी स्पर्धेचे आयोजन आमदार सुभाषभाऊ धोटे मित्र मंडळ च्या सौजन्याने करण्यात आले आहे. या स्पर्धेत राजुरा, गोंडपीपरी, कोरपना, जिवती येथील जवळपास ८० भजन मंडळी सहभाग घेतला असून या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या भारूडांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यात प्रथम पारितोषिक रोख रक्कम २१०००, द्वितीय १९०००, तृतीय १७०००, चतुर्थ १५००००, पाचवे १३००० सहावे ११००० सातवे ९०००,आठवे ७०००, नववे ५००० दहावे ३००० अकरावे २००० तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ढोलकी वादक २००१ उत्कृष्ट गायक २००१ रुपये अशा पारितोषिकांचा समावेश आहे.
आज दि. २७ डिसेंबर सकाळी १० वाजता आ. सुभाष धोटेंच्या हस्ते राजुराचे आराध्य दैवत माता भवानीचे विधीवत पुजन व दर्शन घेऊन भवानी मंदिर येथून भव्य दिंडी यात्रा काढण्यात आली. यावेळी स्वतः आ. सुभाष धोटे यांनी पारंपरिक वारकरी वेषभूषा धारण करून विविध भजनाच्या तालावर ठेका घेत सहभाग घेतला. भक्तीमय वातावरणामुळे संपूर्ण राजुरा नगरी दुमदुमन गेल्याचा साक्षात्कार सर्वांनी अनुभवला. यानंतर दुपारी १ वाजता स्पर्धेचा उद्घाटन सोहळा लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, संचालक तिरुपती इंदूरवार, जगदीश बुटले, कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, जेष्ठ व्यापारी सुधाकर बोनगिरवार, दिनकर कर्नेवार, माजी नगरसेवक गजानन भटारकर, सेवा कलश फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत धोटे, धनराज चिंचोलकर, इर्षाद शेख, प्रणय लांडे, कोमल फुसाटे, आशिष नलगे, विलास कोंगरे, दिपक पानघाटे, मारोती आगलावे, कुशाल गोहकार, दिवाकर वाघमारे, पुंडलिक तुरनकर यासह राजुरा आणि परिसरातील अनेक गनमान्य नागरिक, भारूड भजन मंडळाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव ठावरी यांनी केले तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. दिंडी व कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.