कीडझी आणि ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक उत्सव साजरा…
यावर्षी 22/12/2023 रोजी वार्षिक उत्सव आयोजित करण्यात आला होता. ज्याचा मुख्य उद्देश स्त्री शक्तीचा आदर करणे हा होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देवराव भोंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा चे तहसीलदार ओमप्रकाश गौड होते. सिद्धी विनायक एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य, अध्यक्ष विनायक चिल्लावार, उपाध्यक्ष सौ. संध्या ताई चिल्लावार सचिव सौ. मयुरी मॅम, संचालक डॉ. स्वप्नील चिल्लावार, कार्यकारी संचालक अॅड. समीर चिल्लावार उपस्थित होते.
किडझी व ऑर्किड शाळेच्या मुख्याध्यापिका सिमा आमटे व शिक्षिका मोनाली गुंटीवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे देवराव भोंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
तसेच बोंडे सर, सुदर्शन दाचेवार सर, किरण दुमणे सर, संजय गोरे सर, संदीप जैन सर, सौ.भावना रागीट मॅडम अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात नारी शक्तीचा आदर करत बेटी बचाओ बेटी पढाओ या सन्मानार्थ दरवर्षी ५०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा संकल्प संस्थेच्या कार्यकारी संचालकांनी घेतला आहे. आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री. देवराव भोंगळे यांनी राजुरा येथील उत्कृष्ट प्रगती म्हणून काम करणाऱ्या नामवंत शाळांमध्ये किडझी व ऑर्किड शाळेची नावे सांगितली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.
कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करण्याचे संपूर्ण श्रेय पालक, शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांना देण्यात आले.