उद्यापासून चुनाळ्यात श्री तिरूपती बालाजीचा अठरावा ब्रम्होत्सव सोहळा

0
481

उद्यापासून चुनाळ्यात श्री तिरूपती बालाजीचा अठरावा ब्रम्होत्सव सोहळा

 

२१ डिसेंबर ते २४ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम

 

राजुरा – राजुरा तालुक्यातील चुनाळा सारख्या लहानशा गावात परिसरातील भक्तजनांच्या सहकार्याने श्री तिरूपती बालाजी च्या मंदिराची स्थापना करून अठरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य अठराव्या ब्रम्होत्सव सोहळयाचे आयोजन २१ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले असून यात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

श्री तिरूपती बालाजी देवस्थानात ब्रम्होत्सव सोहळा व नैसर्गिक संकटापासून रक्षण, मनशांती, विश्वशांती आणि प्राणिमात्रांच्या कल्याणाकरीता अष्टोत्तर शत (१०८) कलश अभिषेक, श्री बालाजी कल्याणोत्सव व श्री पुष्प यज्ञ तसेच सुदर्शन महायज्ञ आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील प्रसिद्ध श्री शास्त्रपूर्ण पराशराम पट्टाभिरामाचार्यालू महाराज यांचे शिष्य श्री लक्ष्मणाचार्यालू महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या ब्रम्होत्सवाअंतर्गत परिसरातील गरजू अंध रूग्णांना उपचार होऊन दृष्टी लाभावी याकरीता देवस्थानाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे मेडीकल कॉलेज सेवाग्राम यांच्या सहकार्याने विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व कृत्रीम मोतिबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीरा चे आयोजन २४ डिसेंबर ला सकाळी १० वाजता करण्यात आले आहे

 

ब्रम्होत्सवाची सुरूवात २१ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता ग्रामसफाई व जनजागृती दिंडी ने होईल तर सकाळी १० वाजता रक्तदान व रक्तगट तपासणी शिबीर, रात्रौ ८ वाजंता ध्वजारोहणम नवग्रहपूजा, तर सायं. ८.३० वाजता चुनाळा येथील शालेय विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

 

२२ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता भगवान बालाजी पंचामृत अभिषेक, अग्नीप्रतिष्ठा, सायं. ५ वाजता वधुवरनिर्णयम (साक्षगंध), रात्री ८ वाजता मोशी जि. अमरावती येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांचे किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबर ला सकाळी ८ वाजता नवग्रह पूजा, सकाळी ११ वाजता श्रीनिवास कल्याणम (श्री बालाजी विवाह सोहळा) दुपारी २.०० वाजता देवस्थानाला विशेष योगदान देणाऱ्या या वर्षातील देणगीदात्यांचा सत्कार, दुपारी २.३० वाजता श्री बालाजी, श्री लक्ष्मीदेवी, श्री भुदेवी च्या उत्सव मुर्तीची १०८ कलशासह भव्य शोभायात्रा, सायं. ६ वाजता लक्ष्मीनारायण हवन, रात्री ८.३० वा श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ भेंडाळा यांच्या भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ डिसेंबर ला सकाळी ७ वाजता अवभृधोत्सवम्, चक्रस्नानम्, पूर्णाहूती. सकाळी १० वा विनामूल्य मोतिबिंदू डोळे तपासणी व कृत्रीम मोतिबिंदू भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीराचा उद्घाटन सोहळा, तसेच सकाळी ११ वाजता परभणी येथील किर्तनकार ह.भ.प. कु. ज्ञानेश्वरीताई सोळंके यांच्या किर्तनाचा कार्यक्रम, दुपारी १ वाजता चुनाळा येथील सासरी गेलेल्या सर्व मुलीचा जावयासह सत्कार समारंभ व दुपारी ३ वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

चार दिवस चालणाऱ्या ब्रम्होत्सव सोहळया अंतर्गत आयोजित सपूर्ण सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री तिरूपती बालाजी देवस्थान चुनाळा चे अध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष सुरेश सारडा, सचिव बाय. राधाकृष्ण, सदस्य शामबाबु पुगलीया, शंकरराव पेहुरवार, अशोक शहा, गोरखनाथ शुंभ, मनोज पावडे सह सर्व सदस्यांच्याच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here