साहेब अवैध रेती वाहतूकीवर कारवाई होणार का..?
नांदा फाटा परिसरात राज-रोसपणे अवैध रेती वाहतूक सुरू
मंडळ अधिकारी व तलाठी हित सबंध जोपासन्यात मशगुल
काळी रेती येतात तरी कुठून संशोधनाचा विषय
नांदा फाटा :– नांदा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती वाहतूक राज – रोस पने सुरू आहे. एकीकडे नवनियुक्त तहसीलदार यांनी राष्ट्रीय महामार्ग बनविणाऱ्या कंपनीच्या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक जप्त करून कारवाई करीत आहे. मात्र दुसरी कडे स्थानिक महसूल अधिकारी कानाडोळा करत असल्याने त्यांच्या या भूमिकेकडे नागरिक आता संशयाने बघत आहे.
नांदा फाटा परिसर हा औद्योगिक भरभराटीस येत आहे त्यामुळे परिसरात चांगल्या दर्जाची रेतीची नेहमीच मागणी असते याचाच फायदा घेत अवैध रेती व्यवसायिक आपला डाव साधत असल्याने अवैध रेती धंदा फोफावल्याचे दिसून येत आहे.
या नाल्यातून होत आहे काळया रेतीची उपसा
परिसरातील नांदा, आवाळपूर, कढोली, आसन, धामणगाव, येथील नाल्याला सुद्धा चांगल्या प्रकारची रेती आहे. या नाल्यातील अवैध उपसा करून रेती वाहतूक केली जात असून ही रेती काँक्रिटीकरण व भराईसाठी वापरले जात आहे.
मंडळ अधिकारी व तलाठी हित संबंध जोपासन्यात मशगुल
स्थानिक अवैध व्यवसायिक यांचे विना नंबर पेल्ट चे ट्रॅक्टर दिवसा – ढवळ्या परिसरतील नाल्याची व साठा करून ठेवलेल्या रेतीची अवैध वाहतूक करताना दिसून येत आहे. यावर मात्र आज देखत कारवाई झाली नसल्याने अवैध रेती व्यवसायिक यांच्याशी स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी हित सबंध जोपासन्यात मशगुल असल्याचे दिसून येत आहे.
काळी रेती येतात तरी कुठून संशोधनाचा विषय
तालुक्यातील कोडशी आणि तामसी घाट हा उत्तम दर्जाची काळया रेती साठी ओळखल्या जाते.परंतू आजघडीला ही घाट बंद असतांना नांदा फाटा – आवाळपूर परिसरात ट्रॅक व्दारे काळया रेती चा पुरवठा केल्या जात आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे.अवैध काळी रेतीची वाहतूक राज रोस पने होत आहे आज घडीला देखील परीसरात अवैध साठा केलेली रेती आढळून येत असून दोन दिवसातून एकदा मध्यात्रीचा सुमारास ट्रक द्वारे साठा करून दिवसा विल्हेवाट लावल्या जात आहे.
२४ नोव्हेंबर २०२३ ला नांदा येथे अवैध रेती करणारा ट्रक जप्त केला होता. सदर हायवा ट्रक मालकाने नांदा फाटा परीसरात आपला व्यवसाय वाढविण्यास सुरावात केली होती. यामुळे स्थानिक अवैध रेती व्यवसायिक यांना फटका बसत असल्याने येथील अवैध व्यवसायिक यांनीच मंडळ अधिकारी व तलाठी यांना माहिती देत सकाळी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई करण्यात लावल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.