प्राथमिक आरोग्य केंद्राला अधिकाऱ्यांनी दिली भेट…
राजुरा: प्राथमिक आरोग्य केंद्र, कढोली अंतर्गत उपकेंद्र सास्ती क्र. दोन ला मंत्री (सा. आ.) यांनी नागपूर अधिवेशनासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक यांनी भेट दिली. भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली वैद्यकीय अधिकारी डॉ. ओम सोनकुसरे सर, डॉ. सुवर्णा गेडाम, डॉ. अश्विनी बेले व सर्व कर्मचारी उपस्थित होते. दवाखान्याची पाहणी करण्यात आली. दवाखान्यातील स्वच्छता,आयईसी साहित्य, दवाखान्याबाहेरील परिसर पाहून सर्व अधिकारी वर्ग यांनी अतिशय समाधानकारकरीत्या आपले मत दर्शविले. प्रथम आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत सर्व रेकॉर्ड अद्यावत आढळले. गावातील प्रतिष्ठित वर्गांना भेटून करावयाच्या नाविन्यपूर्ण उपाय योजना बाबत माहिती दिली.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत नव्याने ज्या काही योजना राबवायचे आहेत. त्याबाबत सुद्धा वैद्यकीय अधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. आणि राहिलेल्या सर्व सुख सोयी अगत्याने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कढोली अंतर्गत सर्वच कामाचा आढावा घेता सर्व अधिकारी यांचे खूप समाधान झाले. वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशंसा सुद्धा केली.
भेटीदरम्यान उपसचिव श्री. की. व्ही. वाहूळ, अपर सचिव संजय डगडे, शंकर खुटवड,अंकित बाभुळकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, डॉ. प्राची नेऊलकर, डॉ.प्रकाश नगराळे,श्री जीवतोडे, कैलास कांबळे,वैभव भुते उपस्थित होते.