राजुरा येथे तालुकास्तरीय जागतिक दीव्यांग आठवडा साजरा
गट साधन केंद्राचे आयोजन
राजुरा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बाबुपेठ चंद्रपूर समग्र शिक्षा समावेशित शिक्षण गट साधन केंद्र पंचायत समिती राजुराच्या वतीने गटशिक्षणाधिकारी गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग साताह (दि. ५) रोज मंगळवारला इंदिरा गांधी डिजीटल प्राथमिक शाळा राजुरा येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी विजय परचाके, प्रमुख अतिथी शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकार, शिक्षण विस्तार अधिकारी संजय हेडाऊ शाळचे मुख्याध्यापक बंडू ताजणे उपस्थित होते.
दिव्यांग सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात लुईस ब्रेल व हेलन कोमर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांचे फॅन्सी ड्रेस, रांगोळी, नृत्य, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेऊन बक्षीस वि तरण करण्यात आले. दिव्यांग सप्ताह कार्यक्रमामध्ये 45 दीव्यांग विद्यार्थ्यांचा सहभाग होता सदर कार्यक्रमाचे संचालन विशेष शिक्षक राजकुमार भूरे व प्रास्ताविक समावेशित तज्ञ देवेंद्र रहांगळे यांनी केले तर मार्गदर्शन समावेशित तज्ञ आशिष बहादुरे, साधन व्यक्ती राकेश रामटेके, मुसा शेख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विशेष शिक्षक नाना डोर्लीकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक दिवाकर चाचरकर, मंगला सोमलकर, मनिषा वांदीले, विषय साधन व्यक्ती रिता देरकर, गिता जांबुळकर, ज्योती गुरनुले, अजय सूर्यवंशी, राहुल रामटेके व राजु रामटेके गट साधन केंद्रातील सर्व कर्मचारी व शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले.