शासनाच्या SGFI आंतरशालेय नॅशनल कराटे स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील चार विध्यार्थ्यांची निवड

0
455

शासनाच्या SGFI आंतरशालेय नॅशनल कराटे स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील चार विध्यार्थ्यांची निवड

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी

बारामती पुणे येथे दिनांक ५डिसेंबर२०२३ रोजी पार पडलेल्या CBSE न्याशनल कराटे स्पर्धेत चंद्रपूर जिल्यातील चार विध्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन करीत चार गोल्ड मेडल जिंकून शासनाच्या एस.जी.एफ.आय. म्हणजे स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया च्या नॅशनल कराटे स्पर्धेकारिता आपली जागा निश्चित केली. एस.जी.एफ.आय नॅशनल स्पर्धा भारत सरकार द्वारे छत्रसाल स्टेडियम मॉडेल टाऊन दिल्ली येथे दिनांक १५ ते २० डिसेंबर रोजी आयोजित केलेली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट एसीसी सिमेंट नगर नकोडा घुग्घुस येथील वर्ग १०वी.मध्ये शिकणाऱ्या आर्यश संजय उपाध्ये व वर्ग ८वी. मधील शोर्या विवेक बोढे तसेच श्री. महर्षी विद्यामंदिर चंद्रपूर येथील वर्ग ७वीमध्ये शिकणाऱ्या हार्दिक राजेश सिंह,कु.सानिया प्रवीण साकरकर वर्ग १२वा यांनी दावेदारी दाखविली होती. आर्येश नी अंतिम सामन्यात पुणे येथील खेळाडूला एकतर्फी जिंकत गोल्ड मेडल प्राप्त केले तसेच शोर्य नी मध्यप्रदेश येथील खेळाडूला अटीततीच्या सामन्यात नमवत गोल्ड मेडल जिंकले. हार्दिक ला अंतिम सामन्यात भोपाळ येथील खेळाडूं लागला या चूरशीच्या सामन्यात हार्दिक नी आपले कौशल्य दाखवीत एकतर्फी विजय प्राप्त केला, त्याच प्रमाणे सानियाने इंदौर येथील विध्यार्थ्याला धूळ चारत गोल्ड मेडल जिंकले.
सर्व जुन्सेई शोतोकान कराटे अससोसिएशन चे खेळाडू असून फिटटूफाईट्स मार्शल आर्ट्स अँड फिटनेस सेंटर जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे मुहाफिज सिद्धिकी सर, नरेश थटाल सर व अंकुश मुळेवार सर यांच्याकडे नियमित सराव करीत आहेत.
माउंट कार्मेल च्या प्रिन्सिपल सिस्टर लीना व श्री.महर्षी विद्यामंदिर च्या प्रिन्सिपल श्रीलक्ष्मी मूर्ती मॅडम यांनी विजयी खेळाडूंना नॅशनल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. टीम कोच म्हणून श्री मंजीत अजित मंडल यांनी मार्गदर्शन केले, जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन चे पदाधिकारी श्री.विनय बोढे सर,श्री.संजय कोल्हे सर,श्री.अविनाश बोंडे सर, श्री. संतोष भटपल्लीवार सर,श्री. मुहाफिझ सिद्दिकी सर,श्री.इमरान खान सर, श्री.जीतू साकपेल्लीवार सर यांचे विजयी खेळाडूंना मोठ्या स्तरावर जाण्यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here