आ. सुभाष धोटेंनी मेघे सावंगी येथे भरती असलेल्या त्या रुग्णांशी संवाद
सहकार्याबदल आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आभार
राजुरा (ता. प्र.) : आचार्य विनोवा भावे ग्रामीण रुग्णालय व आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क सर्वरोग निदान व उपचार शिबीर जिवती, कोरपना या तालुक्यांमध्ये घेण्यात आले. दारिद्रयरेषेखालील गोर-गरीब, गरजू ग्रामीण व आदिवासी समाजातील एकूण 2831 रुग्णांनी सहभाग घेतला त्यापैकी 1000 रुग्णांच्या मोतियाबिंदू हैड्रोसिल, हर्निया, कान, नाक, घसा, वेरिकोस व्हेन्स व इतर शस्रक्रिया, तसेच विविध आजारांचे उपचार आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय येथे पूर्णतः मोफत करण्यात येत आहेत. आज लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे प्रत्यक्ष भेट देऊन कोरपना, जिवती येथील महाआरोग्य शिबीरातील येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला, तब्येतीची चौकशी केली. तर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी देखील येथे उत्तम सुविधा व काळजी घेतली जाते असे समाधान व्यक्त केले. तसेच शिबिरातून अनेक रुग्णांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण झाले त्याबद्दल आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे प्रशासनातील पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना भेटून मनपुर्वक आभार मानले. तसेच भविष्यात असेच सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे चे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, पी. आर. ओ. डॉ. शिंगणे यासह अनेक वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.