पोंभूर्ण्यात सिसिआय अंतर्गत ऑनलाईन नोंदनी प्रक्रिया सुरू करावी
पोंभूर्णा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पोंभूर्णा तालुक्यात अंदाजन ५० ते ६० टक्के कापुस पिकाचा पेरा असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत जिनिंग व्यापारी शेतकऱ्यांकडून साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव लावून कापुस खरेदी करीत आहेत. सनासुदीचे दिवस असल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांही तो विकावा लागत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय दरात कापुस विक्री करता येणारी ऑनलाईन नोंदनी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पोंभूर्ण्यातील शेतकऱ्यांसाठी कृऊबा समिती कार्यालयात ऑनलाईन नोंदनी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी युवासेनेचे उप तालुका प्रमुख रविंद्र ठेंगणे, माजी तालुका प्रमुख दत्तू मोरे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
—————————————————————