आज राजुरा येथे काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा
आ. सुभाष धोटेंच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकणार मोर्चा
राजुरा (ता. प्र.) :- दिनांक ४ डिसेंबर रोज सोमवार ला सकाळी ठिक ११ वाजता भवानी मंदिर राजुरा येथून राजुरा विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात राजुरा काँग्रेसच्या वतीने आयोजित जन आक्रोश मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालय राजुरा येथे धडकणार आहे.
मागील १० वर्षापासून हुकूमशाही सरकारने जनतेची फसवणूक करण्याचे काम सुरू केलेले असून सर्व विभागात खाजगीकरण करून अनेक शासकीय संस्था विक्रीस काढलेल्या आहेत. शेतीमालाला हमीभाव नाही. त्यामुळे या आंधळ्या बहिऱ्या सरकारला जागे करण्यासाठी, ओबीसी समाजात मराठा समाजाला आरक्षण न देणे, बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करणे, अतिवृष्टीमुळे शेतीचे व घराचे नुकसानीचे पंचनाम्याप्रमाणे आर्थिक मदत देणे, वर्ग दोन च्या जमिनी वर्ग एक मध्ये तात्काळ करणे, आदिवासी वगैरे आदिवासींना जमिनीचे पट्टे तातडीने देणे, गॅस पेट्रोल डिझेल व वाढती महागाई यांचे दर कमी करणे, संजय गांधी निराधार योजना व वृद्धापकाळ योजनेची रक्कम लाभार्थ्यांना नियमित देणे, संविधानातील 340 कलमानुसार अंमलबजावणी करणे, ओबीसी मुलांचे बहात्तर वस्तीगृह तात्काळ सुरू करणे, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करणे, विद्यार्थी हितासाठी २० पटसंख्या खालील शाळा बंद होऊ नये यासाठी समूह शाळा संकल्पना रद्द करणे, चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून राजुरा मतदारसंघातील शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देणे, जून – जुलै महिन्यातील अति पावसाने पूर परिस्थिती व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची थकीत नुकसान भरपाई देणे, सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम तात्काळ देणे, सोयाबीन कापूस धान या सर्व पिकासह हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करणे, जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विशेष पीक विमा लागू करणे, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई तातडीने देणे, कृषी पंपाचे वीज जोडणे ताबडतोब करणे, कृषी पंपांना २४ तास विद्युत पुरवठा देणे, घरगुती मीटरचे वाढीव युनिट दर रद्द करणे, वन विभागाकडून मिळणारा वन्य प्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांचा मोबदला तात्काळ देणे, जीवती तालुक्यातील महसूल जमीन पण विभागाच्या रेकॉर्ड मधून कमी करणे, जिवती तालुक्यातील नागरिकांना विविध दाखले स्थानिक स्तरावर देणे, जिवती तालुक्यातील ल.वा. तलावाची मंजूर कामे, जिवती, कोदेपूर, गुडसेला तत्काळ सुरू करणे, राजुरा विधानसभेतील पाठ बंधारे तलावचे अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करणे, जंगली डुकरांना मारण्याची परवानगी देणे नाही तर एकरी ५० हजार नुकसान भरपाई देणे २०१७ ते २०१९ मधील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करणे, दोन लाखाच्या वरील कर्ज माफ करणे, अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायम पट्टे देणे, शेतीकडे जाणारे पांदण रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण करणे, पेसा ग्रामपंचायत मधील हिंदू पत्ता संकलन मजुरांना तात्काळ बोनस देणे, इत्यादी मागण्यांना घेऊन हा जन आक्रोश मोर्चा तहसील कार्यालय, राजुरा येथे धडकणार आहे.
या मोर्चा राजुरा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक व बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शासन प्रशासनाच्या अन्यायाविरुद्ध आपला आक्रोश व्यक्त करावा असे आवाहन राजुरा विधानसभा काँग्रेस, तालुका काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस, अनुसूचित जाती जमाती सेल, विमुक्त जाती जमाती सेल, किसान सेल, ओबीसी सेल, एन एस आय यु तथा काँग्रेस फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.