महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियान आढावा बैठक संपन्न...
चंद्रपूर । गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाशी नगडीत असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मागील तीन वर्षापासून जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायत अंतर्गत ८६ काम करत आहे. कोरोनाचा प्रलयामुळे जिल्हा अभियान समिती बैठक झालेली न्हवती मात्र कोरोनाचा वेग मंदावताच मा. अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली वीस कलमी सभागृह येथे नुकतीच बैठक पार पडली.
सदर बैठकीत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्हा चंद्रपूर अंतर्गत मागील 3 वर्षात झालेल्या कामाचा प्रेझेन्टेशन व विशेष प्रकल्प बाबत आढावा सादर करण्यात आला.
तीन वर्षात झालेले अभियान अंतर्गत गावात झालेल्या कामांची माहिती ,अभिसरण ची आकडेवारी सादर करण्यात आली.तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान मार्फत एकूण प्राप्त ग्रामकोष , खर्चाचे विवरण व कामाबाबत माहिती सादर करण्यात आली.
प्रलंबित कामांचा आढावा व सुचना देण्यात आल्या. चंद्रपूर जिल्हा आदर्श गावांची यशोगाथा दाखविण्यात आली.
क्रॉप शॉप बद्दल माहिती सादर करण्यात आली व त्यामार्फत जिल्ह्यातील कृषी उत्पादनांना थेट बाजारपेठ कशी उपलब्ध होईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या व इतर जाणीव जागृती कार्यक्रमच्या अनुषंगाने जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती मा. जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात आली.
बैठकी दरम्यान नितेश मालेकर, विशाल राठोड, प्रतिक हेडावू, सतीश जमदाडे यांनी झालेल्या विशेष कामाबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी कोविड परिस्थिती मध्ये गाव स्तरावर सर्व ग्राम परिवर्तक यांनी जनजागृती करण्याच्या सूचना व महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानाचा कामाला शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी अजय गुल्हणे जिल्हाधिकारी चंद्रपूर,
राहुल कर्डीले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, कपिल कलोडे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग तथा नोडल अधिकारी चंद्रपूर, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, नागभीड, येथील गटविकास अधिकारी, विभागप्रमुख, वन्य जीव संरक्षण संस्था, टाटा ट्रस्ट यांचे प्रतिनिध व ग्रामपरिवर्तक उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक व आभार जिल्हा समव्यक विद्या पाल यांनी केले.