घुग्घुसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिक सिग्नल लावण्याची भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची मागणी
घुग्घुस शहराच्या मध्यभागी असलेल्या नवीन बस स्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिक सिग्नल लावा अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी घुग्घुसचे ठाणेदार आसिफराजा शेख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून लोकसंख्या हि ५० हजारांच्या जवळपास आहे. परिसरात वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लॉयड्स उद्योग आहे. त्यामुळे बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते जडवाहनांची व इतर वाहनांची वाहतूक मोठया प्रमाणात सुरु असते.
चौकात ट्राफिक सिग्नल नसल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिक सिग्नल लावण्यासाठी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी शिष्टमंडळासह ठाणेदार आसिफराजा शेख यांची भेट घेतली व चर्चा करून निवेदन दिले याप्रसंगी ठाणेदार आसिफराजा शेख यांनी लवकरच ट्राफिक सिग्नल लावण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे,माजी सरपंच संतोष नुने, राजेश मोरपाका,स्वप्नील झाडे,संदीप तेलंग,गोविंदा घोडके व कार्यकर्ते उपस्थित होते.