घुग्घुस येथील गोंडवाना गोटूल कमिटी तर्फे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

0
522

घुग्घुस येथील गोंडवाना गोटूल कमिटी तर्फे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

१५ नोव्हें. : आज गोंडवाना गोटूल घुग्घुस येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती साजरी करण्यात आली. अवघ्या २५ व्या वयात आयुष्यात आदिवासी मध्ये क्रांतीची ज्योत पेटऊन ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा उभारणारे म्हणजे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा,१८९४ मध्ये भीषण दुष्काळ उपास मारीने अनेक लोक मरण पावले. शेतसारा माफ करा. त्यांनी इंग्रजा विरुद्ध जनआंदोलन केले व त्यांना दोन वर्षाची करावास झाली.१८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने पारंपरिक तिर, कमठा,भाले यांच्या साह्याने इंग्रजा विरुद्ध लडा दिल्या.असे अनेक जुल्मअत्याचार विरुद्धात उलगुलान केले व देशासाठी शहिद झाले अशा या जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

उपस्थित समाज बांधव मन्देश्वर पेंदोर, गणेश किन्नाके, मनोज चांदेकर, देविदास किवे, दिपक पेंदोर, कुणाल टेकाम, लतिश आत्राम, बालकिशन कुडसंगे, गुरुदेव गेडाम, मोरेश्वर उईके, सुभाषभाऊ तुमराम, परशुराम कोहरे, शरद अवताडे, राजू मडावी, वासुदेव मडावी, शिवम तुमराम, अंकुश उईके, मनिष आत्राम, अरविंद किवे, संदीप तोडासे, विठ्ठल कुंभरे व समस्त आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here