चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात शासकीय आधारभूत केंद्र सुरू करा- डॉ. श्याम हटवादे यांची मागणी!
चंद्रपूर -चिमूर । किरण घाटे
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सध्या माेठ्या प्रमाणात धान पिकांची कापणी सुरु अाहे .दिवाळीच्या पुर्वि मळणी होऊन शेतकऱ्यांच्या हातात धानाचे पीक (उत्पन्न) येणार आहे. परंतू शासकीय आधारभूत केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव मिळणार नाही.शेतकरी वर्गांच्या परिस्थितीचा विचार करता शासकीय आधारभूत केंद्र चिमूर तालुक्यातील प्रत्येक सहकारी संस्थेत सुरू करण्याची मागणी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. श्याम हटवादे यांनी एका पत्रकातुन केली आहे.
सध्याचे स्थितीत धान पिकांची कापणी सुरू झालेली आहे .दिपावली पूर्वी धान कापणी पूर्ण होणार असून मळणी झाल्यावर उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहे .आर्थिक संकटाच्या चक्रव्युहात अडकलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, धानास योग्य भाव मिळावा आणि शेतक-यांची गळचेपी होऊ नये यासाठी राज्य शासनाने चिमूर तालुक्यातील प्रत्येक सहकारी संस्थेत शासकीय आधारभूत केंद्र सुरू करावे अश्या आशयाची मागणी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ.श्याम हटवादे यांनी केली असून या मागणी संदर्भात चिमूर विधान सभा क्षेत्राचे विद्यमान आमदार बंटी भांगडीया यांना सुद्धा आपण निवेदन सादर करणार असल्याचे डाँ. हटवादे यांनी या प्रतिनिधीस सांगितले.