वनविभागाकडून धाडसे कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत
आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या सूचनेनुसार वनविभागाच्या वतीने एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत मंजूर
चिमूर/- चिमूर तालुक्यातील विहीरगाव येथील रहिवासी स्व. मधुकर जंगलू धाडसे (वय/वर्ष ५०) यांचा दि. २९ ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेनंतर आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी प्रत्यक्ष धाडसे कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट दिली व धाडसे यांच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार वनविभागाच्या वतीने धाडसे यांच्या कुटूंबास एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत मंजूर झाली असून वनविभागाने धाडसे कुटुंबियांना धनादेश आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी आमदार बंटीभाऊंनी धाडसे कुटुंबीयांची सविस्तर विचारपूस केली व त्यांना धीर देत सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच, ग्रामस्थांच्या सर्व समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी वनविभागाला सक्त सूचना दिल्या.
यावेळी उपसंचालक कुशाग्र पाठक,वनपरिक्षेत्र अधिकारी योगिता आत्राम मॅडम,भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग (बालू) पिसे, भाजपा नेते योगेश नाकाडे, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख प्रवीण गणोरकर, भाजपा पं.स. सर्कल प्रमुख गजानन गुडधे, भाजपा पं.स. सर्कल प्रमुख प्रशांत अंदनसरे, भाजपा बूथ अध्यक्ष केशव घरत व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यापुढील मदतीची रक्कम या कुटूंबाला लवकरात लवकर देण्याच्या सूचना आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.