राजुरावासीय करणार दहशतवाद व भ्रष्टाचाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
राजुरा (ता.प्र.) – दिनांक 24 आक्टोंंबरला विजयादशमी निमित्त आदिवासी संघटना आणि भवानी माता देवस्थान ट्रस्ट यांच्यात ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या अध्यक्षतेत राजुरा पोलिस ठाण्यात बैठक झाली. अखेर या विषयावर चर्चा होऊन सामंजस्याने होऊन तोडगा काढण्यात आला. या विजयादशमी उत्सवात दहशतवाद व भ्रष्टाचाराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे. ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी दिलेल्या प्रस्तावावर दोन्ही बाजूंनी एकमत झाल्याचे पत्रकारांना सांगण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम व नरेश उरकुडे हे उपस्थित होते.
यावेळी भवानी माता देवस्थान ट्रस्ट तर्फे सुनिल देशपांडे, आदिवासी संघटनांतर्फे मधुकर कोटनाके, वाघु गेडाम, बाबुराव मडावी, भाऊजी कन्नाके, महिपाल मडावी, संतोष कुळमेथे, घनश्याम मेश्राम, नितीन शिडाम, अभिलाश परचाके, शुभम आत्राम, रविंद्र आत्राम, अमृत आत्राम, बाळकृष्ण मसराम, आनंद शिडाम यांचेसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.