कोरपणा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागणार मोठा झटका?
कोरपना प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर गेल्याचे चित्र दिसून येत आहे. यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याच्या हेतूने, पक्ष फोडा फोडीचे काम सुरू आहे. यातच राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले. आणि अश्यातच अनेक कार्यकर्ते संभ्रमात पडले की, शरद पवार साहेब यांच्या गटात राहायचं की अजितदादा पवार यांच्या गटात, हा प्रश्न अनेक युवा , ज्येष्ठ कार्यकर्त्यांना पडला. आणि त्यात चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार खासदार नसल्याने आता कुठे जायचं यात अनेक कार्यकर्त्यांची गळचेपी झाली. अश्यातच राष्ट्रवादीचे माजी जिल्हासचिव प्रविण काकडे, जिल्हाउपाध्यक्ष सुनील अरकीलवार, तालुका उपाध्यक्ष करण सिंग भुरानी, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक मुनीर शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा ठीक ठिकाणी सुरू आहे.
अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.