विरूर ठाणेदारांनी राबिविला परिसर स्वच्छ व वृक्षसंवर्धन मोहिम, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विरुर स्टे./अविनाश रामटेके
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वछता सेवा 2023 पंधरवडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे,महात्मा गांधीजी यांच्या जयंती चे औचित्य साधून विरुर ठाण्याचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी युवकांचा उत्साह वाढविण्यासाठी विरुर येथिल युवकांना स्वछता मोहीमे बद्दल आव्हान केले त्यामुळे दिनांक 1ऑक्टोबर ला सकाळी दहा वाजता विरूर ठाण्यातील आवारात एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी विरुर ठाण्यातील परिसर स्वच्छ करून वृक्षसंवर्धन करण्यात आले.
पर्यावरण विषयी असलेले प्रेम व वृक्षसंवर्धनाची आवड जोपासत ठाणेदार निर्मल यांनी विरुर ठाण्याचा चेहरामोहरच बद्दलविला ,तिथे असणारी फुलझाडे ,विविध फडझाडे
व बापू कुट्टी ही अधिकच आकर्षित करते त्यामुळे विरुर येथील युवक ठाणेदारांची पर्यावरण व स्वच्छते विषयी असलेली कळकळ बघता विरुर येथील युवकांनी मोठ्या संख्येत सहभाग घेऊन स्वछता मोहीम राबविण्यात आली ,
लोकसहभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ग्रामस्थ व युवकांनी आपल्या गावाला स्वच्छ व सुंदर पुढाकार घ्यावा असे उपस्थितीना आव्हान केले,यावेळी उपस्थितींना पोलीस विभागाकडून टी शर्ट चे वितरण करण्यात आले
सदर स्वछता उपक्रम राबविण्या करिता अनिल आलाम सरपंच ग्रा प विरुर स्टेशन , प्रीती पवार उपसरपंच ग्रा प विरुर ,भीमराव पाला अध्यक्ष तंटामुक्त विरुर, अविनाश रामटेके सदस्य जिल्हा शांतता समिती , अजय रेडी अजित सिंग ,प्रदीप पाला ,शाहू नारनवरे शंकर झाडे ,गजानन ढवस ,सचिन बलकि तसेच सर्व पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.