बैल पोळा व तान्हा पोळा गडचांदुरात मोठ्या उत्साहात साजरा…
गडचांदूर : उत्सव समितीतर्फे गडचांदुर शहरांमध्ये बैलपोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 150 बैल जोड्या नी सहभाग नोंदविला. यामध्ये जोडी जुळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास शर्ट कापड देण्यात आले होते. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती बालाजी नगरी माधव हेपट तसेच व्यापारी असोशियन गडचांदूर यांच्या सहयोगाने देण्यात आले. तसेच यशोधन विहार माढा कॉलनी व नगरपरिषद गडचांदूर यांच्यातर्फे जोडी जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यास टोपी व दुपट्टा देण्यात आला. या बैलपोळ्यामध्ये तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे प्रथम द्वितीय तृतीय चौथे आणि पाचवे असे बक्षीस जोड्यांना देण्यात आले. या जोड्यांना आकर्षक सील्ड देण्यात आले. प्रथम क्रमांक प्रेमकुमार मेश्राम यांच्या जोडीस देण्यात आले. ते पारितोषिक पोलीस स्टेशन गडचांदूर यांच्याकडून पाच हजार एक तसेच नगरपरिषद गडचांदूर कोण बॅटरी चाली त स्प्रे पंप तसेच दुसरे क्रमांक प्रवीण देवाळकर यांच्या जोडी देण्यात आले. ते बक्षीस रंगनाथ स्वामी सहकारी संस्था यांच्याकडून होते. तिसरे बक्षीस स्वर्गीय जलील भाई यांच्या स्मृतिपित्त वसीम बॅग यांच्याकडून होते ते बक्षीस अशोक जी एके यांच्या जोडी देण्यात आले. तसेच चौथे बक्षीस रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्था यांच्याकडून होते. पाचवे बक्षीस संजय मेंढी रमसेवक मोरे यांना सुधा बैलपोळ्यांचे बक्षीस मिळाले व यांच्याकडून फवारणी पंप होते.
या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजक मनोज भोजकर, मयुर एकरे, बंटी गुरनुले, पंकज इटनकर, संतोष महाडोळे,रोहन काकडे,रुपेश चुधरी, रोहित शिंगाडे, अजीम शेख, प्रणित अहिरकर, राहुल थेरे, वैभव गोरे , निखिल एकरे, अतुल ताजने, बादल पेचे, मेघराज एकरे हे होते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे मा गडचांदूर पोलीस स्टेशन चे निरीक्षक रवींद्र शिंदे, शरद जोगी, विक्रम येरणे, सचिन भोयर, रामसेवक मोरे, बेलोरकर सर, अकनूरवर सर, राउफ खान, सतीश उपलांचीवार, सुलीन झाडे, मेडी भाऊ, ताजने पाटील, गोरे पाटील, शामराव झाडे, एकरे पाटील, माथुलकर पाटील, अनिल निवलकर, बंडु चौधरी इत्यादी पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन अतुल गोरे, पवन राजूरकर यांनी तर आभार पोळा समिती च्या सर्व सदस्य यांनी मानले.