पुरोगामी विचारमंच द्वारा भव्य जनआक्रोश मोर्चाची तहसील कार्यालयावर धडक, कंत्राटी नोकरभरतीचा निषेध

0
526

पुरोगामी विचारमंच द्वारा भव्य जनआक्रोश मोर्चाची तहसील कार्यालयावर धडक, कंत्राटी नोकरभरतीचा निषेध


राजुरा, दि. 18 सप्टेंबर : आज पुरोगामी विचारमंच राजुरा द्वारा भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यात जवळपास राजुरा शहरातील 25 सामाजिक संघटनांचा सक्रिय सहभाग होता.

हा मोर्चा संविधान चौक, नाका नं ३, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालय येथे पोहचला.

हा मोर्चा मार्गक्रमण करत असतांना सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जनविरोधी जीआर गांधी चौक व तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जाळण्यात आला.

महाराष्ट्र सरकारने नुकताच जीआर काढून शासकीय सेवेतील पदभरती कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब व होतकरू मुलांचे भविष्य दावणीला लागणार आहे. दिवसरात्र अभ्यास करून शासकीय नोकरीला लागण्याचे तरुणांचे स्वप्न आता भंगणार आहे. या निर्णयामुळे आरक्षणा सारख्या संवैधानिक मुद्द्यालाही निकामी करत केवळ कागदावरच ठेवत व सामाजिक सौहार्द बिघडवत राज्यातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ मांडला आहे. या निर्णयामुळे आरक्षणाला काहीही महत्व उरणार नसून गरिबी व दरिद्रता राज्यातील जनतेच्या नशिबी मारण्याचा डाव राज्यकर्त्यांनी मांडला आहे. तसेच राज्यातील 62 हजार सरकारी शाळा 10 वर्षाकरिता भौतिक सुविधा उपलब्ध करुण देण्याच्या नावावर कॉर्पोरेट क्षेत्रातील खासगी कंपन्यांना दत्तक देऊन छुप्या पद्धतीने शाळांचे खासगिकरण करण्याचा डाव आखून राज्यातील तमाम बहुजन मुलांच्या शिक्षणाच्या घटनादत्त अधिकारावर घाला घालणार आहे.

जर हे जनविरोधी जीआर महाराष्ट्र शासनाने परत घेतले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदना द्वारा देण्यात आला.

मोर्चाच्या यशस्वितेसाठी युवक-युवती, महिला, शिक्षक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. या मोर्चात मुख्य संयोजकाच्या भूमिकेत धीरज मेश्राम, दिनेश पारखी, ॲड. मारोती कुरवटकर, अमोल राऊत, संतोष कुळमेथे, रमेश आड़े, संभाजी साळवे, पुंडलिक वाढ़ई होते. तसेच ॲड. डॉ. सत्यपाल कातकर, बलवंत ठाकरे, डॉ. मधुकर कोटनाके, संदिप कोंडेकर, प्रदिप पायघन, फझल भाई, श्रीकृष्ण वडस्कर, किसन बावणे, विजय मोरे, साईनाथ परसुटकर, किरण लांडे, धनंजय बोरडे, सुभाष पावड़े, विजय भोयर, दिलीप गिरसावळे, नंदूभाऊ वाढ़ई, आनंद अंगलवार, दिलीप निमकर, नीलेश पवार, मनोज सदाफळे, संजय बोबाटे, पी. एन. वाढ़ई यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here