राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट
विविध मागण्यांना घेवून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट देत आंदोलकांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री अजीत पवार यांच्या प्रयत्न पोहचवू असे अश्वासन दिले आहे.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थांकरिता प्रत्येक जिल्हात मुला मुलींकरिता स्वतंत्र वसतीगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण पेंडालाला भेट देत उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची भेट घेतली आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी टांगे यांच्या प्रकृतीची विचारणा करत त्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या आहे. शिंदे – फडणवीस सरकार ओबीसी समाजाच्या मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आंदोलकांच्या भावना आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.