पद्मश्री परशुराम खुणे यांनी घेतली अम्माची भेट

0
514

पद्मश्री परशुराम खुणे यांनी घेतली अम्माची भेट

अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतुक

पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवास स्थानी अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सदर उपक्रमातून शेकडो गरजूंना मायेचा घास भरविल्या जात असल्याचे म्हणत उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांचीही उपस्थिती होती.
चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमा अंतर्गत शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीला दररोज घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. सदर उपक्रमाला राजकीय पक्षांच्या नेत्यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली असून उपक्रमाचे कौतूक केले आहे.
कुटुंब निरोगी तर समाज निरोगी आणि समाज निरोगी तर आपला देश निरोगी या सशक्त, सुदृढ समाज सूत्राचे पालन करत आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या स्वगृही अम्मा का टिफिन या उपक्रमाची गेल्या तीन वर्षापूर्वी सुरवात केली. याच माध्यमातून गरजूंची दर महिन्यात आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य त्याप्रमाणात मोफत औषध औपचार दिल्या जातो. समाजाचे आपण काही देणे लागतो या सामजिक भावनेतून समाजातील गरजू व्यक्तींना अम्मा का टिफिन घरपोच दिल्या जातो.
दरम्यान आज शुक्रवारी झाडीपट्टी नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने डंका वाजविणारे पद्मश्री पूरस्कार प्राप्त परशुराम खुणे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी येत अम्माची भेट घेतली. यावेळी अम्मा चा टिफिन परिवाराशी त्यांनी चर्चा केली. अम्माने कष्ट करुन जोरगेवार कुटुंबाला उभे केले आहे. आजच्या पिढीसाठी अम्माचा प्रवास प्रेरणादाई आहे. मुलगा आमदार असतांनाही अम्माने कष्ट करण्याचा मार्ग सोडलेला नाही. कधीकाळी गरिबीचे चटके सोसलेल्या अम्माने आता गरीब गरजूंसाठी सेवा कार्य सुरु केले आहे. त्यांनी सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम अनेक गरजुंसाठी उपयुक्त असल्याचे ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here