सर्वद फाउंडेशनचा स्टार पुरस्कार सोहळा संपन्न
मुंबई प्रतिनिधी : महेश कदम
सर्वद फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र या संस्थेचा जीवनगौरव व स्टार पुरस्कार सोहळा अभय इंटरनॅशनल स्कूल, विक्रोळी या ठिकाणी संपन्न झाला. मा. जयवंत चौधरी, मा. रमाकांत ठाकूर, मा. भास्कर राऊत, मा. अरुण तुळजापूरकर, मा. विद्या पेठे, यांना जीवनगौरव २०२३ या सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. श्री. विशाल धर्माधिकारी यांना अध्यात्मिक व सामाजिक कार्य, मानसी बोरसे-हिरे यांना उत्कृष्ट गायन, श्री. प्रदीप गीते यांना सामाजिक कार्य स्टार पुरस्काराने सन्मानित केले गेले. याच बरोबर साहित्य, कला, संगीत या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींना सर्वद स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. श्री. हर्षवर्धन जाधव उपसचिव, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिका श्रीमती डाॕ. प्रतिमा इंगोले, पॅराकमांडो मधुसूदन सुर्वे ,ज्येष्ठ छायाचित्रकार श्री. पराग शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अभय इंटरनॅशनल स्कूलचे संचालक श्री. तुषार गायकवाड यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुचिता पाटील यांनी केले, यावेळी पालघर, ठाणे, उनभाट या सर्वद शाखांचे निवड पत्र कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध भागातून पुरस्कारार्थी उपस्थित होते तसेच सर्वदला शुभेच्छा देण्यासाठी पत्रकार डॉ. संतोष राणे, जालंदर चकोर आणि हरिश्चंद्र चौधरी देखील उपस्थित होते. महाराष्ट्रभरात साहित्य, कला, संगीत, सामाजिक कार्य करणाऱ्या गुणवंतांच्या कार्याला प्रोत्साहन देणे आणि सन्मान करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे असे सर्वद फाउंडेशनचे संचालक श्री. ओंकार देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.